ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सिंधुदुर्गची कन्या पूर्वा हितेश सावंत भारतात दुसरी

३६ वि ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा: रौप्य पदकाची मानकरी

सिंधुदुर्ग ; प्रतिनिधी

आसाम गुवाहाटी येथे सुरु असलेल्या ३६ व्या ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सिंधुदुर्गची कन्या पूर्वा हितेश सावंत हि भारतातून दुसरी आली असून तिने रौप्य पदक पटकाविले आहे. ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया ( AFI ) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


पूर्वा सावंत हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भडगाव गावचे सुपुत्र तसेच उद्योजक हितेश सावंत यांची मुलगी आहे. ती १८ वर्षे वयाची असून कोविड महामारी मुळे तिला आपल्या वयापेक्षा २ वर्षे पुढील २० वर्षीय गटात खेळावे लागले होते. त्याचबरोबर कोविड काळात सराव नसतानाही जिद्दीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.


महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना तिने रौप्य पदक पटकाविल्याने आपल्या कुटुंबाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हयाचे व महाराष्ट्र राज्याचे नाव उज्जवल केले आहे. १२.२४ मीटर जंप मारून तिने उत्कुष्ट अशी वैयक्तिक कामगिरी केली आहे. प्रशिक्षक वीरेंद्र यादव यांनी तिला प्रशिक्षण दिले, तर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक. इंडियन ऑलम्पिक असोशिएशनचे उपाध्यक्ष नामदेव शिरगावकर , माजी ऑलिम्पिकपट्टू आनंद मेनेझिस व आई वडील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *