नांदेड ;प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील हिप्परगा देशमुख येथिल संगम निवासी मतिमंद शाळेत लपून बसलेल्या घुबडाच्या पिल्लास सिर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी पकडून दोन महीने आसरा दिला व वन विभागाशी संपर्क साधून सुरक्षित पणे जंगलात सोडून देवून जिवदान दिले.
मुखेड तालुक्यातील हिप्परगा (देशमुख) येथील संगम निवासी मतिमंद शाळेत तीन दिवसांपासुन एक विचित्र आवाज तेथील मुक्कामी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऐकू येत होता त्यामुळे शाळेच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,हा आवाज विचित्र असल्यामुळे शाळेच्या परिसरात व गावातील नागरीकांमध्ये तेथे भुतप्रेत तरी नसेल या अंधश्रद्धेपोटी शाळेच्या परिसरात जाण्याचे कोणी धाडस करत नव्हते ही घटना कळताच तेथील शाळेचे मुख्याध्यापक संग्राम गायकवाड यांनी जळकोट तालुक्यातील सर्पमित्र पक्षीमित्र सिद्धार्थ काळे यांना फोनवरून वरील घटनेचे सर्व माहिती दिली.
सर्पमित्र सिद्धार्थ काळे व त्यांचे सहकारी मित्र सुहास वाघमारे हे काहीवेळातच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्या जागेची सर्व पाहणी केली असता त्यांनाही तो विचित्र आवाज ऐकून प्रश्न पडला , सर्पमित्र हे आपले सर्व साहित्य घेऊन त्या जागेवर गेले असता तेथे त्यांना दोन अतिशय लहान अवस्थेत गव्हाणी घुबडाचे पिल्ले दिसून आले. गावकऱ्यांच्या सांगण्यावरून असे कळाले की तीन दिवसांपूर्वी रोडवर एका घुबडाचा मृत्यू झाला होता , ते मृत झालेले घुबड ह्या पिल्लांची आई असावी व हे पिल्ले भुकेपोटी ओरडत होते.
सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी वन विभागाशी संपर्क साधून त्या दोन पिल्लांना आपल्या ताब्यात घेतले व घुबडा विषयी असलेली अंधश्रद्धा व गैरसमज गावकर्यांना सांगून भयमुक्त केले.
हे पिल्ले अतिशय लहान असल्यामुळे त्यांना सहज उडताही येत नव्हते त्यामुळे सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी त्या पिल्लांना उडता येईल व आपले भक्ष्य स्वत: करता येईल तोपर्यंत त्यांचे पालन-पोषण आपल्या घरी केले , हे पिल्ले पुर्णता: मांसाहारी असल्यामुळे त्यांनी आपल्या स्वखर्चातून तब्बल दोन महिने पालनपोषण करून वन विभागाशी संपर्क साधून त्या पिल्लांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.
सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी गव्हाणी घुबडा विषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली .
गव्हाणी घुबड साधारणता: ३६ से.मी चा असतोत्याच्या पार्टीकडून सोनेरी बदामी आणि राखाडी रंग व त्यावर काळ्यापांढर्या रंगाचे पट्टे असतात त्याच्या पोटाकडे रेशमी पांढरा रंग व बदामी रंगाची झाक त्यावर गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात त्याचे डोके गोलसर आकाराचे पासून ते हुबेहूब माकडासारखे दिसते गव्हाणे घुबडाचे चोच बाकदार असते, नर-मादी दिसायला सारखेच असतात.
गव्हाणी घुबड हे संपूर्ण भारतात आढळतो हा मुख्यतो जुन्या इमारती किल्ले कडेकपारी व शेतीच्या परिसरात राहणे पसंत करतो याचे खाद्य मुख्यता उंदीर घुशी सरडे पाली असून तो पुर्णता: मांसाहारी असतो
यांची घरटी जमिनीपासून उंच ठिकाणी झाडांच्या ढोलीत काड्या वापरून घरट्यावर दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी तयार केलेली असते.
या घुबडाची एकाच वेळी पांढऱ्या रंगाचे गोलसर ४-७ अंडी देते या घुबडाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अपशकुनी मानले जाते तर इंग्लंडमध्ये याला विद्वत्तेचे प्रतीक मानतात अशी सविस्तर माहिती देऊन आपल्या साप अथवा परिसरामध्ये जखमी पशुपक्षी आढळल्यास त्याला न मारता जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क करा असे आवाहन सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी गावकऱ्यांना केले.
( सर्पमित्र सिद्धार्थ काळे संपर्क :- ९६२३७२९४३८)
Good post. I absolutely love this website. Continue the good work! Melesa Francisco Isahella
thanks
Thank you for this beautiful article. It’s really a good article