कंधार ; प्रतिनिधी
सध्याच्या काळात वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीचा समाजाला विसर पडतांना दिसतो आहे.या दिवसाचे औचित्य साधून श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव कामे रोड कंधार या ज्ञानालयात 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे अतिरेकी बाॅम्ब हल्ल्यात धारातीर्थी पडवेल्या भारतीय शहीद वीरांना आदरांजली वाहण्यात आली.
पहिल्या प्रथम संस्थेच्या प्रथेनुसार वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली.श्री शिवाजी हायस्कूल कंधारच्या मैदानातील वृक्षवल्लींना गुलाबपुष्प देवून अनोखा पर्यावरणाशी व्हॅलेन्टाईन दिन सुरुवात करतांना उपमुख्याध्यापक आदरणीय दत्तात्रय रेणके सर यांच्या समर्थ हस्ते पहिल्यादा वृक्षारोपण गुलाबपुष्प देवून कार्यक्रमास सुरुवात झाली.पोलिस काॅस्टेबल मा.केंद्रे साहेब यांनी वृक्षांना गुलाबपुष्प दिले.हा दिवस खरचं अशा अनोख्या पध्दतीने साजरा करतांना आम्हाला जगतगुरु संत तुकोबाराय यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी,वगैरे पक्षी रे,आळविती! या अभंगाची आठवण येते.
नंतर ज्युनियर विभागाचे प्रमुख प्रा.सदानंदजी कांबळे सर यांनी देखील वृक्षवल्लींना गुलाबपुष्प देवून पर्यावरणाशी व्हॅलेन्टाईन कसे करावे याबद्दल त्यांनी महत्व विशद केले.भारतात सारे व्हॅलेन्टाईन डे प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होत असतांनाच श्री शिवाजी हायस्कूल कंधार आपल्या विविध उपक्रमाने सुपरीचीत असलेल्या ज्ञानालयात पर्यावरणाशी व्हॅलेन्टाईन डे हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.दत्तात्रय एमेकर यांनी हा कार्यक्रम भारतीय वन विभागाने सुरु करुन वृक्ष संवर्धनाचा समाजाला कानमंत्र द्यावा.असे प्रतिपादन केले.मा.तुकाराम कारागीर सर यांनी वृक्षावर प्रेम करुन पर्यावरण बद्दल जनजागरण मोहीम राबविण्यात यावी असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात सुत्रसंचलन प्रा.सदानंद कांबळे यांनी केले,तर आभार प्रदर्शन संग्राम जाधव सर यांनी मानले.या कार्यक्रमात उपमुख्याध्यापक दत्तात्रय रेणके सर,कंधार पोलिस स्टेशनचे केंद्रे साहेब प्रा.सदानंद कांबळे सर,तुकाराम कारागीर सर,संग्राम जाधव सर,सेवाचार्य अशोक कांबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे क्षणचित्रे श्री शिवाजी विद्यालय बारुळचे स.शि.शिखरे सर यांनी उत्कृष्ट टिपली आहेत.