कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य खाजगी मान्य शिक्षक मंहासंघाच्या वतीने आज दि.22 रोजी तालुकाध्यक्ष भास्कर कळकेकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोशल डिस्टंसिंग ठेवून बैठक घेण्यात आली.यावेळी वाढता कोरोना बाबत शिक्षकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य खाजगी मान्य शिक्षक मंहासंघाच्या वतीने कंधार तालुक्यातील खाजगी शिक्षकांना कोरोना बाबत राजहंस शहापुरे यांनी आवाहन केले.
यावेळी श्री शिवाजी उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मंजूर अहेमद,विद्याविकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजहंश शहापुरे,रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.जी.मुंडे,इंदीरा गांधी प्राथमिक शाळा कुरुळा येथिल मुख्याध्यापक पेठकर एस.जी,महात्मा फुले प्राथमिक शाळेचे वाघमारे डी.जी.,किरण लोहाळे,मंहमद जमील,निसार अहेमद आदीसह खाजगी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.यावेळी सर्वांनी कोरोना बाबत मॉस्क वापरणे,वेळोवेळी सँनिटायझर वापरणे,सोशल डिस्टंसिंग ठेवणे बाबत राजहंस शहापुरे यांनी आवाहन केले.