कंधारः- प्रतिनिधी
शेकापुर येथिल महात्मा फुले विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कामेश्वर वाघमारे यांनी दोघांचे प्राण वाचवले त्याबद्दल त्याला पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार प्राप्त झाला.धाडसी कामेश्वर वाघमारे यांचा आदर्श विद्यार्थ्याने घ्यावा असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती माजी उपसभापती आणि महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव पाटील केंद्रे यांनी केले.
धाडसी कामेश्वर वाघमारे यांना पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार मिळाल्यामुळे शेकापुर येथील महात्मा फूले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने या धाडसी बालकाचा सत्काराचे आयोजन शेकापुर येथील महात्मा फूले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व माजी सरपंच शिवाजीराव केंद्रे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य व उपसभापती प.स.कंधार संभाजीराव पाटील केंद्रे , गट शिक्षणाधिकारी संजय येरमे , एस एस सी बोर्ड लातूरचे अध्यक्ष डुकरे , प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे , सहसचिव रेखाताई शिवाजीराव केंद्रे ,पालक जगन्नाथ वाघमारे ,पोलीस पाटील भीमराव पाटील गाडेकर,संभाजी पा.लाडेकर , तुकाराम वाघमारे पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे अदिसह मान्यवर उपस्थित होते .
आपल्या भाषणात पुढे बोलताना संभाजीराव केंद्रे म्हणाले की मिळालेल्या पुरस्काराला साजेल असे चांगल्या प्रकारे अभ्यास करून भविष्यात मोठे यश मिळवून आई-वडिलांच्या नावाबरोबर शाळेचे नाव उज्वल करावे असा आशीवाद यावेळी संभाजी पाटील केंद्रे यांनी दिला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महात्मा फूले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा पूर्वीपासून टॉप टेनमध्ये आहे या विद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले आणि ते आज मोठ्या पदावर आहेत. कामेश्वर वाघमारे यांनी मिळवलेल्या पुरस्कार मोठ्या धाडसाचा आहे. त्यामुळे कामेश्वर वाघमारे कडे पाहून आपणालाही काही करता येते का यांची स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहावी असे सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कामेश्वर वाघमारे यांनी जीवाची बाजी लावून नदीत बुडत असलेल्या दोन मुलांचे प्राण वाचवले. कामेश्वर वाघमारे चा आम्हाला गर्व आहे तो आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे त्याला पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार मिळाल्यामुळे आमची छाती अभिमानाने भरून येते. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. असेही ते म्हणाले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कामेश्वर वाघमारे यांना विद्यालयाच्या वतीने शालेय साहित्य भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.के. वरपडे यांनी केले .तर आभार प्राध्यापक अरुण केदार यांनी मानले.