मौजे वंजारवाडी ग्रामपंचायत ला निधी कमी पडू देणार नाही. -सौ.आशाताई शिंदे

कंधार प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे वंजारवाडी ग्राम पंचायत बिनविरोध काढण्यात आली,त्यामुळे पाच लक्ष रुपयाचे सी.सी. रस्त्याचे भूमिपूजन सौ.आशाताई शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या तथा आमदारच्या प्रतिनिधी) यांच्या हस्ते करण्यात आले.दि.23 फेब्रुवारी 2019 रोजी 11 वाजता मौजे वंजारवाडी येथे पाच लक्ष रुपयाचे सी.सी.रस्त्याचे भूमिपूजन सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की, गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
आपल्या तालुक्यात एक जिनिंग फॅक्टरी चालू करणार असुन त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही.नवीन गूळ फॅक्टरी सुरू केली आहे.आम्ही जेवढे बोलतो तेवढे काम करतो आपल्या मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस मी आमदार तथा सनदी अधिकारी यांची पत्नी आहे,असे समजत नसून मी एक सामाजिक कार्यकर्त्या असून समाजाचे एक देणे आहे. असे समजून विकासकमासाठी मी स्वतःला झोकून टाकले आहे.मौजे वंजारवाडी ग्राम पंचायत आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून बिनविरोध काढली त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन.. आणि निवडणुकीत कुठलेच आश्वासन दिले नाही.पण निवडणूक झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचा विकास कसा करणार ते पहा असेही म्हणाले होते.मी विकास करणार आहे व मौजे वंजारवाडी ग्राम पंचायत ला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.


या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माधव मुसळे (तालुका प्रमुख शिवसेना कंधार)ज्ञानोबा मुंडे( सरपंच) ज्ञानोबा घुगे( सरपंच) ॲड.महेश कारामुंगे (सरपंच)सौ.राजश्री भोसीकर (सरपंच) सौ. उषाताई भोसीकर,राजू बोरकर (सरपंच) चक्रधर घुगे, प्रभाकर केंद्रे,ग्रामसेवक चौंडे आदींची उपस्थिती होते. यावेळी मौजे ग्रामपंचायत वंजारवाडी ग्रामपंचायत सरपंच सगुणाबाई गीते,उपसरपंच आनंदा केंद्रे सदस्य ज्ञानोबा गीते,अंजना गीते,माया गीते व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन बळवंत मोतीराम कागणे तर प्रास्ताविक परमेश्वर गीते आणि आभार धोंडीबा भायेगावे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *