नांदेड : येथील संबोधी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर पालिमकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल हॉस्टेल येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत संबोधी मित्र मंडळाची नांदेड जिल्हा स्तरीय पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त शिक्षक धर्मेश माणिकराव कसबे व गोविंद कुरवडे या दोघांची जिल्हा उपाध्यक्ष पदी तर जिल्हा संघटक पदी प्रा. सदानंद कांबळे व मु. अ. बंडू वामनराव सितळे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा सचिव पदी मिलिंद खरे व दयानंद मनोहर तारु तर पवन पुंडलिकराव कांडलीकर यांची युवा जिल्हाध्यक्ष पदी, संदीप आनंदराव वाठोरे व गौतम आठवले – जिल्हा युवा सरचिटणीस पदी तर अविनाश सोनुले यांची हदगाव तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.
विशेषतः संबोधी अकादमी महाराष्ट्र च्या वतीने १६ मे २०२१ रोजी औरंगाबाद येथे ८४ हजार बुद्धमूर्तीचे मोफत वाटप करण्यात येणार असून, या विषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
सर्व प्रथम संबोधी मित्र मंडळाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेश पंडित यांनी केलेल्या प्रास्ताविकात संबोधी अकादमीच्या सामाजिक व धार्मिक कार्याची भूमिका विशद केली तर विहारासाठी व वैयक्तिक गृह पूजेसाठी विनामूल्य बुध्द मूर्तीचे जास्तीत जास्त वाटप होण्यासाठी पदाधिकारी आणि उपासकांनी आँनलाईन नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर पालिमकर यांनी यावेळी केले.
कार्यकारिणीवर निवड केलेल्या पदाधिकार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीस प्रा. राजेश पंडित (जिल्हा सरचिटणीस), आयु. पुंडलिकराव नरवाडे,प्रा. सदानंद कांबळे, मु. अ. बंडू सितळे सर सुकळीकर, मिलिंद खरे सर, प्रा दयानंद तारू, पवन कांडलीकर, सुर्यकांत तारु, बापुराव उघडेराव, आनंदा तारु, लोएकरे अशोक, संदीप वाठोरे, गोविंद कुरवडे युगातंर राऊत आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. बंडू सितळे यांच्या आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली. या वेळी अनेक पदाधिकारी व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.