- नांदेड ; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स, राज्य कार्यालय मुंबईच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील स्काऊट विभागासाठी राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिर दि. १६-०२-२०२१ ते १९-०२-२०२१ या कालावधीत जिल्हा कार्यालय’ नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात जिल्ह्यातील एकूण सहा शाळेतील २१ स्काऊटस् सहभागी झाल्या होते .
या चार दिवशीय शिबीरामध्ये राज्यसंस्थेच्या सुचनेनुसार चाचणी शिबीरामध्ये सहभागी विद्यार्थांची तोंडी,प्रात्यक्षिक व लेखी स्वरुपात चाचणी घेण्यात आले.या शिबिर प्रमुख म्हणून दिगबंर करंडे, शिबीर सहाय्यक पी एम कुलकर्णी, आर आर फुलारी व हेमंत बेडें यांनी मार्गदर्शन व चाचण्या घेतल्या. यावेळी सहभागी शाळेतील स्काऊटर बालाजी तोरणेकर, शशिकांत गोरशेट्वार , राजू पवार, बी.एम. कारखेडे , कांबळे सर इत्यादी उपस्थित होते. सदर चाचणी शिबिरास अधिकारी व पदाधिकारी यांनी भेटी देऊन सहभागी स्काऊटना शुभेच्छा दिल्या. शेवटी समारोप कार्यक्रमात महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती साजरी करण्यात आली.