जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका – माजी सभापती बालाजी पांडागळे यांचे उस्माननगर येथे प्रतिपादन

कंधार/प्रतिनिधी:

गावातील जनतेच्या तुमच्या कडुन खूप अपेक्षा आहेत. गावच्या विकासासाठी राजकारण न करता गावच्या विकासाच राजकारण करुन गावचा विकास करा जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कंधार तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती बालाजी पाटील पांडागळे यांनी उस्माननगर केले .

उस्माननगर येथील जामा मज्जीत येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमातील अध्यक्षपदावरून बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शमीम अब्दुल्ला कुरेशी माजी महापौर मनपा नांदेड , कंधार पंचायत समिती सभापती सौ. लक्ष्मीबाई घोरबांड , चांदभाई खुरेशी मनपा नगरसेवक नांदेड , सय्यद भाई काजी , साजिद भाई काजी , चांद भाई कुरेशी नांदेड , नागोराव मोरे आलेगावकर , ईकबाल नांदेडवाले , मुक्तार कुरेशी व्यंकटराव पाटील घोरबांड ,राम सोनसळे ,विश्वंभर लोंढे अमिन शहा.अशोक काळम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

कार्यक्रमाचे आयोजक आमिनशा फकिर , मुखीद मौलाना यांच्या वतीने अनेक मान्यवरांसह प्रमुख पाहुण्यांच्या शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला .त्यानंतर नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सरपंच श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड, उपसरपंच शेख बाशिद नबीसाब ,ग्रामपंचायत सदस्य आंगुलीमाल सोनसळे,रब्बानी काशीम शहा,कमलाकर शिंदे ,गोंविद पोटजळे,संगीता विजय भिसे,रेखा गंगाधर भिसे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना ते म्हणाले की , उस्माननगरच्या जनतेने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देऊन ग्रा.प.ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिली आहे.तेव्हा सरपंच उपसरपंच व काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गावच्या विकासाचे राजकारण करावे.कंधार प.स.सभापतीपद आणि गावचे सरपंच पद एकाच घरात आलेले आहे. सुनबाई सभापती तर सासुबाई गावच्या सरपंच झाल्याने गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. मागील काळात थांबलेले विकासाचे कामे लवकरात लवकर पूर्ण करुन जनतेने तुमच्यावर टाकलेला विश्रास खरा करुन दाखवा.काँग्रेस पक्षाचे काही ऊमेदवार कोन्ही एका मताने तर काही चार मताने पराभूत झालेले आहेत .पराभूत झालेल्यानी खचुन न जाता गावच्या विकासासाठी सरपंचाना सहकार्य करुन गावचा विकास व पक्ष संघटनेस तत्पर राहावे. पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागावे नाराज होण्याचे कारण नाही .काँग्रेस पक्षाने पूर्वी पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे .भविष्यात यामध्ये वाढ होणार असून उस्माननगर ग्रामपचायतीत सरपंच किंवा उपसरपंच पाच वर्षे न रहाता त्यावर मध्येच अविश्वास दाखल करुन त्याना पायउतार करण्यात येते हे चित्र मागील पंधरा ते विस वर्षांपासून चालु आहे. हे चित्र थांबवण्यासाठी महत्त्वाचे काम नवीन सदस्यांना करायचे आहे. अशा खेळामध्ये एका दोघाचा आर्थिक फायदा होतो पण गावचा विकास होत नाही. त्यामुळे भविष्यात कुणाच्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी एकत्र राहुन गावचा विकास करुन घ्यावा .नवनिर्वाचित सरपंच. उपसरपंच व नवीन सदस्यांकडुन जनतेच्या खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षाना तडा जाऊ देऊ नका.
गावातील विकास कामासाठी कुणापुढे हात करण्याची आवश्यकता नसून आमचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू व गावाचा कायापालट करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .मी सभापती असताना गावाच्या विकासासाठी भरपूर निधी प्राप्त करून विकास कामे केली .यापुढेही गावाच्या विकासासाठी आम्ही सक्षम असल्याचे सांगितले.यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय भिसे यांनी केले तर आभार ग्रा.पं.सदस्य कमलाकर शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *