कंधार दि. 24 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
गावातील सर्वसामान्य तळागाळातील दुर्बल घटकातील लोकांना विकासाचा केंद्रबिंदू मानून आपल्या गावाचा विकास करा असे आवाहन सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी बहादपुरा ता. कंधार ग्रामपंचायतीच्या भेटीप्रसंगी व ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार स्वीकारताना केले.
या भेटीप्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर बहादरपुरा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. गोदावरीबाई गायकवाड उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर,ग्रामविकास अधिकारी परशुराम वाडीकर,सचिन पाटील पेठकर ग्रामपंचायत सदस्य बालाजी तोटेवाड, अवधूत पेटकर,भीमराव कदम,सुदर्शन पेटकर,मन्मथ मेळगावे ग्रा. प.सदस्य शँखतीर्थ, शेख दस्तगीर, खादर भाई, तुलशिराम पालिमकर, गावातील नागरिक व कर्मचारी उपस्थिती होते.
बहादरपुरा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांची निवड झाल्यावर ग्रामपंचायत च्या विनंतीवरुन संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांनी दिनांक 24 रोजी ग्रामपंचायत कार्यालयस भेट दिली याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने वतीने भोसीकर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सौ.वर्षाताई म्हणाल्या की केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या नव नवीन विविध योजना आपल्या गावांमध्ये राबवा जनसामान्य गोर गरीब कुटुंबांना आपल्या ग्रामपंचायती मार्फत न्याय मिळवून देण्याचे काम ग्रामपंचायतीने करावे हे करत असताना सामान्य मानुस हाच विकासाचा केंद्रबिंदु ठेऊन विकासाची वाटचाल करावी,या कामी माझे सदैव सहकार्य राहील असे सौ. वर्षाताई म्हणाल्या.
याप्रसंगी बोलताना जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर म्हणाले की गेल्या अनेक वर्षानंतर बहादरपुरा ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून या बद्दल मी सर्वात प्रथम गावातील मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय भोसीकर म्हणाले की ग्रामपंचायत अंतर्गत यापूर्वी देखील माझे लक्ष होते यापूर्वी देखील विविध माध्यमातून गावाला व गावातील नागरिकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे देखील भविष्यामध्ये आमचा सहकार्य राहील गावकऱ्यांनी दिलेल्या संधीचे आपण गावातील जनतेच्या विकासासाठी करून आपला व आपल्या गावचा लौकिक वाढवावा असे आव्हान संजय भोसीकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील पेठकर यांनी केले सूत्रसंचालन शेख दस्तगीर यांनी केले आभार वाडीकर यांनी केले यावेळी गावातील नागरिकांची व कर्मचारी यांची उपस्थिती होती