कंधार ; प्रतिनिधी
येथिल शासकीय विश्रामगृह येथे माजी सनदी अधिकारी,सिने अभिनेते,नंदीकेश्वर नगरी रायवाडी भुषण,मुक्ताई-सटवाजी सुत अनिल उर्फ एकनाथराव मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळयात हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांनी कंधार येथे कल्पक नाम अक्षर गणेश भेट देवून वाढदिवसाचे अनोखे अभिष्टचिंतन केले.
हल्ली वाढदिवस साजरे करतांना नानाविध कल्पना वापरुन सृजनशील सदिच्छा देण्याची जणु परंपराच बनली आहे.सोशल मिडीयामुळे वाढदिवसाची तारीख अगदी सहज समजत आहे.मित्र परिवार अन् स्नेही जणांच्या सदिच्छांचा वर्षाव होतो.
दि.24 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड होते तर प्रमुख पाहूणे म्हणून कंधार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ,स्वातंत्र्य सैनिक रामराव पवार ,पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण, मामा मित्र मंडळाचे मारोती मामा गायकवाड, माजी पंचायत समितीत सदस्य माधवराव गीते ,माजी सैनिक कल्याणकर ,कांबळे ,नामदेवराव कुट्टे ,डाॅ.मंगनाळे ,हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर, नवनिर्वाचित अध्यक्ष पत्रकार ,सचिन मोरे व सचिव पत्रकार दिनकर जायभाये आणि सर्व सदस्य,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिर्झा जमीर बेग सचिव दिगांबर वाघमारे आणि सर्व सदस्य,काँग्रेस सोशल मिडियाचे ता.प्रमुख सतिश देवदत्त ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार कोकाटे ,हिंदवी बाणाचे संपादक माधवराव भालेराव ,राजरत्न गायकवाड , मुरलीधर थोट ,संघपाल वाघमारे, दैनिक समिक्षाचे पत्रकार मित्र एस.पी.केंद्रे आदीची यावेळी उपस्थिती होती.