लोहा/. प्रतिनिधी.शिवराज दाढेल लोहेकर
लोहा,जुना लोहा येथे दि.२५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसेश्वर युवा मंच लोहा,वंचित बहुजन आघाडी लोहा शाखा व मित्रपरिवरच्या वतीने अहमदपूरकर महाराज यांच्या प्रतिमेची विधिनुसार आरती व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या जयंती कार्यक्रमाप्रसंगी लोह्यातील
समाजसेवक दत्ता भाऊ शेटे,लोहा न.प.चे माजी नगरसेवक युवराज वाघमारे,बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हरिभाऊ शेटे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश आनेराव,शिक्षक स्वप्निल शेटे,राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव,लहुजी शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष टी.के.दाढेल दाढेल,मानव हीत लोकशाही पार्टी तालुकाध्यक्ष शिवराज दाढेल,वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सदाभाऊ धुतमल,राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे तालुका सरचिटणीस माधवराव ससाने,सुभाष बनसोडे,पिंटू वड्डे,संतोष कंकरे, मशिवा कातुरे,गजानन शेलगावकर, बबलू कांजले,मारुती वड्डे,चंद्रकांत सोनवळे,उमाकांत सोनवळे,माधव स्वामी,राजु चव्हाण,बाबुशा महाराज, दिगंबर महाराज सावरगावकर,बालाजी केंद्रे,मारोती मामा आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी स्वप्निल शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते बोलताना म्हणाले की राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे कार्य समाज उपयोगी व समाज सुधारणेचे होते त्यांनी आपल्या आयुष्याचं संपूर्ण शतक जनजागृती मध्ये आणि लोक कल्याणामध्ये घालवले,असा महान तपस्वी या पृथ्वीतलावर न भूतो न भविष्यती होणे कदापि शक्य नाही.त्यांचे कार्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे व तसेच ते पुढील अनेक पिढ्यांसाठी
शिदोरी आहे. आणि सदैव त्याचे जतन आपण सर्वांनी करायला हवे असे प्रतिपादन स्वप्निल शेटे यांनी याप्रसंगी केले