कंधार ; प्रतिनिधी
कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन जनतेला मास्क लावण्याबाबत आवाहन करत आहे.परंतु अद्याप अनेकांना कोरोना म्हणजे खेळ वाटत असून शासनाला दोष देत ते सर्रास समाजात वावरत आहेत.अशा महाभागाना धडा शिकवण्यासाठी कंधार शहरात प्रशासन एकवटले असून दि.२५ फेब्रुवारी रोजी विना मास्क फिरणा-या ५१ जणांवर पहील्या दिवाशी कार्यवाही करत दंड वसुल केला असल्याची माहीती तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
तहसिलदार व्यंकटेश मुंडे ,पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ रोजी सकाळी शहरातील दुकाने, टपरी व रस्तावरुन ये जा करणारे वाहन चालक बिना मास्क आढळून आल्यास प्रत्येकी २०० रुपये दंड वसुल करण्यात आला.अशा एकुण
बिनामास्क फिरणा-यांना ५१ लोकां कडून दंड घेण्यात आला आहे.
यावेळी व्यंकटेश मुंडे तहसीलदार कंधार ,संग्राम जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कंधार, नगरपालिका कर्मचारी उलेवाड, राहूल खोडसकर, बडवणे व तहसीलदार कर्मचारी मंडळधिकारी सुजलेगावकर साहेब, तलाठी केंदे, कसेवाड, कापसे व मंडळधिकारी शेख तसेच पोलीस कर्मचारी सुनिल पत्रे, टाकरस, व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.