कंधारः प्रतिनिधी
भारतात ओबिस समाज खुप मोठा आहे. परंतु हा समाज एकजुट नसल्यामुळे विखुरल्या गेला आहे.१९३१ सालीच ओबिसीची समाजाची जनगणना झाली त्यावेळी ५२ टक्के समाज असल्यामुळे २७ टक्केच आरक्षण देण्यात आले.ओबिसी समाजात खुप जाती असल्यामुळे आज हा समाज 60टक्के इतका झाला आहे त्यामुळे आरक्षण कमी पडत आहे.त्यासाठी सरकारने स्वातंत्र्य ओबिसी समाजाची जाती निहाय जनगणना करावी अन्यथा मोठे अंदोलन उभारण्यात येईल अशा ईशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुर्यकांत मारुती चिंतेवार यांनी दिला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सुर्यकांत मारुती चिंतेवार यांची नुकतीच निवड करण्यात आली.चिंतेवार कंधार तालुक्यातील भुमीपुत्र असल्यामुळे त्यांनी पहिल्या प्रथम संत नामदेव महाराज यांचे दर्शन घेऊन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी चिंतेवार बोलताना म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात ओबिसी समाज खुप मोठा समाज आहे परंतु हा समाज विखुरल्या गेला असल्याने एकजुट नाही. या विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली ,वरिष्ठानी दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शाखा उभारणार असल्याची माहीती यावेळी चिंत्तेवार यांनी दिली.
सन १९९० साली माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांनी ओबिसी मंडल अयोगाची स्थापना करुन या समाजाला न्याय देण्याच काम केले होते.तेव्हा पासुन ओबिसी समाजाला कोन्हीच वाली नव्हता.माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबिसी समाजाची जनगणना झाली पाहीजे असा प्रस्ताव मांडला होता यावर विधानसभेत बहुमत झाले आहे.
केंद्रात भाजप सरकार असल्याने ते जास्तीचे गांभिर्य घेतील असे वाटत नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात ओबिसी समाज मोठे अंदोलन उभारेल अशा ईशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रुजू झालेले सुर्यकांत मारोती चिंतेवार यांनी पत्रकार परिषदच्या माध्यमातुन दिला आहे.