फुलवळ सर्कल मधून पंचायत समिती निवडणूक लढविणार- माजी सरपंच बालाजी देवकांबळे

कंधार – प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कल मधून आरक्षण (एसी ) सुटल्यास व आरक्षण जाहीर होताच पंचायत समिती निवडणुक लढविणार असल्याची माहीती माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी आज दि.18 मार्च रोजी दिली.

कंधार तालुक्यातील फुलवळ सर्कल मध्ये बालाजी देवकांबळे यांची चांगलीच पक्कड आहे. या भागामध्ये गोरगरिबांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांची ओळख आहे.

बालाजी देवकांबळे यांची सन 2015 मध्ये फुलवळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड झाली आणि सरपंच ,उपसरपंच या पदावर जाऊन त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांचा अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क वाढत गेला.

सध्या ग्रामीण भागांमध्ये त्यांची चांगलीच पक्कड आहे.ती द्वीगुणीत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी चालू आहेत. फुलवर सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा सर्कल मधील अनेक कार्यकर्त्यांची आहे.

फुलवळ सर्कलसह यांची पक्कड ग्रामीण भागांमध्ये चांगली असल्यामुळे त्यांच्या कामाला पाहून या ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्यासाठी 2016-17 झाली
नांदेड जिल्हाचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी बालाजी देवकांबळे यांचे काम पाहून व जनतेचे प्रेम पाहून फुलवळ सर्कलमधून काँग्रेस पक्षाचे तिकीट 2016 -17 साली जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढवा असे आदेश बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी दिले होते थोड्या फरकाने पराभव झाला.

पुढे बोलताना माजी सरपंच बालाजी देवकांबळे म्हणाले की लोहा कंधार मतदार संघाचे काँग्रेसचे प्रभारी डॉ.श्याम पाटील तेलंग व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव पाटील गिरे यांनी व तालुक्यातील सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी मला आदेश दिला आणि मी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आदेशाचे पालन करून काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि थोडेफार मतांनी पराभूत झालो, खचून न जाता लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दिवस-रात्र काम करत जनतेची सेवा चालू असून
कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल मध्ये आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषद निवडणुक लढविणार असल्याचे मत माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बालाजी देवकांबळे यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झालंच नाही या अगोदरच अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणूक लढविणार असल्याची चर्चा लोहा कंधार मतदार संघामध्ये आहे.मी कसल्याही प्रकारचा दिखाऊपणा न करता फुलवळ – सर्कल मधून पंचायत समिती निवडणूक लढणार असून सर्कलमधून मतदारांनी आशीर्वाद व आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचे पालन करू येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती निवडणूक लढविणार असल्याची माहीती माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *