कंधार ; ता.प्रतिनिधी
जगात सध्या कोव्हीड-19 महामारीचे संकट आहे त्यातच आपल्या कंधार नगर परिषदेच्या वतीने नळाद्वारे जे पाणी पुरवठा केला जातो तो अंत्यत पिवळसर व गाळ असलेले घाण पाणी आहे. त्यामुळे दुसरे आजार होऊन शहरवासीयांचा जिव धोक्यात येवू शकतो . तसेच कंधार शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शहरात सॅनीटाझर ची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करावे अशी मागणी कंधार येथे भाजपाच्या वतीने
रजत शहापुरे यांच्या वतीने मुख्याधिकारी न.पा यांना करण्यात आली आहे.
कंधार नगरपालीकेच्या वतीने शहरात पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येते.सध्या होणारा पाणीपुरवठा अशुद्ध होत आहे.सदरील पाणी हे लिंबोटी वरून पुरवठा केला जातो.सध्या शहरात कोरोणा पाँजिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत .त्यामुळे त्या त्या ठिकाणी फवारणी करावे असे निवेदन नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक जितेंद्र ठेवरे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी भाजपा सोशल मिडिया प्रमुख रजत शहापुरे ,भाजपा शहर चिटणीस महेश मोरे,मनोज कांबळे, सौरभ बिडवई,अक्षय वडजे आदी उपस्थित होते.