नांदेड ; प्रतिनिधी
नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळी नंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवनुकीलाही परवानगी नव्हती.पण 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारा मध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले होते . गुरुद्वारा चौरस्त्यावरही पोलीस तैनात होते.चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती.पोलीसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटिंग तोडली. त्यामुळे तनाव निर्माण झाला.सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी तनावपूर्ण वातावरण आहे…
चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल फोडन्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक यांची गाडी फोडण्यात आली.
नांदेड मध्ये दररोज कोरोना चे एक हजार हुन अधिक रुग्ण सापडत असून 17 ते 18 जणांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे गुरुवार पासून टाळे बंदी करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर ही आज शीख समाजाच्या वतीने हल्ला बोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला, त्यात 10 पोलीस जखमी झाले. तर 30 ते 40 मोबाईल फोडण्यात आले, पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडण्यात आली.