पोलीसांवरील हल्ला दुर्देवी दोषींविरुध्द कठोर कारवाई करु – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड :- पोलीसांवरील कांही समाज कंटकांनी केलेला हल्ला अत्यंत दुर्देवी असून या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. नांदेडमध्ये अशी घटना घडणे वाईट आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेतर्फे हल्लाबोल कार्यक्रम होवू नये यासाठी चर्चा करुन कार्यक्रम न करण्याचा निर्णय झाला होता. पोलीस प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बाबाजींनी सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. तथापि, हल्लाबोलमध्ये कांही समाज कंटकांनी पोलीसांवर हल्ल्याचे जे कृत्य केले त्या दोषी लोकांविरुध्द शासनातर्फे कठोरातील कठोर कारवाई करु असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या हल्ल्यातील जखमी पोलीसांची त्यांनी आस्थेने विचारपूस करुन त्यांना ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या तात्काळ पुरविण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे त्यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक घेवून त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *