जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण प्रणालीद्वारे दिनांक २७.२.२०१७ च्या शासन निर्णयान्चये करण्याबाबत सुधारित धोरण निश्चितकरण्यात आले. आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करीत असताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांचे नव्याने बदली धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. वरील बाबींचा विचार करुन शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग यापुर्वीच बगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत संदर्भ क्र.४ ते १३ च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले होते. सदरचे संदर्भ क्र.४ ते १३ चे शासन निर्णय अधिक्रमीत करुन आता जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी जिल्हांतर्गत बदल्यांचे सुधारित धोरण शासनाने घेतलेल्या निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे.
अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र यांचीही विभागणी यात कायम ठेवण्यात आली आहे. परिशिष्ट १ मध्ये नमुद असणाच्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषाची पर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निशित करण्यात येईल. वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील. बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवेनुसार अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली होईल.
.
या शासनाच्या बदली धोरणानुसार निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक /मुख्याध्यापक यांच्या बदल्या होतील. शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेच सक्षम प्राधिकारी असणार आहेत. ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित घरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षकच बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक असे म्हणता येईल. यासाठी वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
शाळामध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष पुर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्याचा मुद्दा परिशिष्ट-१ मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिध्द करतील. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी वे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आयोजित करतील.
या धोरणानुसार शाळानिहाय रिक्त जागा घोषित कराव्या लागतील. मुख्य कार्यकारी अधिका्यांकडून जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चिती करण्यात येणार आहे. सदर कार्यवाही करीत असताना प्रथमतः मा.उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र.३२७८/२०१० बाबत दिनांक १३.९.२०१२ व दिनांक २१.११.२०१२ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिलयातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निबळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्राचील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी आहे. त्या जागा दाखविण्यात येतील. समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे भरती किया अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत. अशाप्रकारे शाळानिहाय ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकान्यांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणात्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही.
आॅनलाईन बदली प्रक्रिया होणार ही चांगली बाब आहे. संवर्ग-१मध्ये थोडी सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयानुसार अवघड शाळा कमी होतील, असे दिसते.
संवर्ग-२ साठी अधिकृत रित्या ३० कि मी अंतरासाठी कोणती पद्धती ग्राह्य धरणार हे स्पष्ट होत नाही. एस.टी. महामंडळ, सा.बां. विभाग, की गुगल मॅप यांचा उलगडा केलेला नाही. टप्प्या टप्प्याने बदली प्रक्रिया होणार ही चांगली बाब आहे.
विशेष संवर्ग-१ मागील बदली नंतर ३ वर्षापर्यंत बदली करू शकणार नाहीत. बदली पात्र साठी एका शाळेवर ५ वर्ष असणे ही हिरमोड करणारी बाब आहे. विशेषतः गैरसोयीत असलेल्या शिक्षकांसाठी ही नाराजीचीच गोष्ट आहे.
▪️ समानिकरणाच्या जागा रिक्त ठेवणे आणि प्रथम अवघड क्षेत्रातील जागा भरणे या बाबीही इतरांसाठी गैरसोयीच्या ठरू शकतात. एकल शिक्षक शिक्षिकांसाठी विशेष सुधारणा नाहीत
३०जून अंतिम तारीख येणार असे अपेक्षित होते पण तो बदल झाला नाही. योग्य परिस्थितीत प्रतिनियुक्ती ही एक चांगली बाब म्हणता येईल. संवर्ग-२ साठी जे पात्र ठरणार नाहीत(३०कि मी आतील जोडपे) त्यांना जर एका शाळेवर ५ वर्ष पूर्ण झाले असतील तर त्यांना यात संरक्षण दिसत नाही. कदाचित ते संवर्ग -४ नुसार पात्र होऊ शकतात. यावेळी पसंती क्रमात ३० शाळा देता येतील. एका शाळेवर किमान पाच वर्षे सेवा हे या gr चे वैशिष्ट्य आहे. 30 शाळा मागण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी वीस शाळा मागता येत होत्या. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी एका शाळेवर किमान 3 वर्षे सेवेची अट. बदली प्रक्रियेनंतर काही अपरिहार्य कारणास्तव रिक्त पदावर प्रतिनियुक्ती मिळविता येईल. (बालसंगोपन रजा, प्रसूती रजा, गंभीर अपघात. बदली पूर्वी बदली प्रक्रियेविषयी सर्व शिक्षकांना सविस्तर माहिती होण्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्या बदलीपूर्वी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
बदली पात्र शिक्षकांना खो देता येणार ! खो ची पद्धत बंद झाली नाही. बदल्या एकदम न होता संवर्ग 1 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया राबविली जाणार, संवर्ग 2 ची पूर्ण झाली संवर्ग 3 नंतर चार त्यानंतर विस्थापित झालेल्या शिक्षकांची रिक्त पदावर सेवाज्येष्ठता विचारात घेऊन बदली होणार. एकूण सेवा दहा वर्ष आणि विद्यमान शाळेवर पाच वर्ष ही अट महत्वाची आहे. पती-पत्नीसाठी तीस किलोमीटर अंतराचे बंधन कायम आहे. संवर्ग 1 व 2 साठी : एकदा बदललीनंतर तीन वर्ष थांबावे लागणार आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर रिक्त जागा दाखवल्या जाणार आहेत. संवर्ग 1, संवर्ग 2,संवर्ग 3 संवर्ग 4 असा एकेक टप्पा पूर्ण केला जाणार आहे. एकावेळी फॉर्म भरायचे नाही. यामुळे सर्व्हवर लोड येणार नाही.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
दि.९/०४/२०२०