भोसीकर दाम्पत्यांची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कंधार कोविड सेंटरला सॅनिटायझर,हैंड ग्लोज,मास्क, फळे व मिनरल वॉटर ची भेट

कंधार दिनांक 28 एप्रिल (प्रतिनिधी)

नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर व सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षाताई भोसीकर हे दांपत्य दरवर्षी सामाजीक व लोकोपयोगी उपक्रम राबवून आपल्या लग्नाच्या वाढदिवस साजरा करत असतात याच उपक्रमाचा भाग म्हणून दिनांक 28 एप्रिल रोजी आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी कंधार कोवीड सेंटर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर,हैंड ग्लोज,मास्क व रुग्णांसाठी फळे, बिस्किट व मिनरल वाटर आदींची भेट देऊन अत्यंत साधेपणाने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय कंधार चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश देशमुख,डॉ. संतोष पदमावार,डॉ.अंजली कुरुलेकर, बहदरपुरा चे उपसरपंच हणमंतराव पाटील पेठकर,हुजूर साहेब ब्लड बैंक चे संचालक माधवराव सुगावकर माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजीराव चुकलवाड,सरपंच व सोशल मीडिया प्रमुख सतीश देवकते,बालाजी तोटवाड, अजिंक्य पांडागळे, मन्मथ मेलगावे, संभाजी नांदेडे,कोविड सेंटर येथील डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी व पत्रकार बंधु आदींची उपस्थिती होती.

गतवर्षी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लॉकडाउन मुळे बेरोजगार असलेल्या गरजू कुटुंबांना अन्नधान्य व भाजीपाला वाटप करून संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूची लागण झालेली आहे विशेष करून महाराष्ट्र, नांदेड जिल्हा व ग्रामीण भागामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावर कोरोना ची लागण झाली असून,यामुळे आरोग्य यंत्रणे वर खुप तान पडत आहेत याच पार्श्वभूमीवर या महामारी च्या संकट काळामध्ये कोविड सेंटर कंधार येथील कर्मचारी व रुग्णांसाठी सामाजीक बंधीलकीतुन मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न भोसीकर दाम्पत्यांनी केला.
याप्रसंगी संजय भोसीकर यांनी ग्रामीण रुग्णालय कंधार येतील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले व कंधार/लोहा तालुक्यातील जनतेला असे आवाहन केले की या संकटाच्या काळात नागरिकांनी अत्यंत संयम बाळगावा शासनाच्या सूचनाचे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे छोटा मोठा आजार आल्यास तात्काळ आपली तपासणी करून घेऊन योग्य उपचार करून घ्यावा वेळेवर उपाय न केल्यामुळे रुग्ण गंभीर होत आहेत या महामारी च्या संकट काळात संयम बाळगून आपल्या व आपल्या कुटुंबाचा बचाव करावा असे संजय भोसीकर म्हणाले.

          याप्रसंगी सौ. वर्षाताई म्हणाल्या की भारतामध्ये व महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर लसी करण्याचे काम सुरुवात झाली असून आजपर्यंत अनेक नागरिकांनी लस घेतली आहे परंतु आजही ग्रामीण भागामध्ये  या बद्दल अनेक गैरसमज आहेत या लसीच्या कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकट भीती न बाळगता विशेष करून महिलांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे ही लस अत्यंत असुरक्षित असून मी सुद्धा ही लस लस घेतली आहे त्यामुळे मला कुठलाही प्रकारचा त्रास झाला नाही तरी माझे सर्व नागरिकांना विनंती राहील की शासनाच्या नियमाचे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे.या वेळी डॉ.लोणीकर यांनी भोसीकर दांपत्याना शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *