नांदेड ; प्रतिनिधी
सोशल मीडियावर दिलीप ठाकूर यांचे लॉयन्सच्या डब्याचे सतत होत असलेले कार्य पाहून न्यू जर्सी अमेरिका येथील अनिवासी भारतीय नेमिशा पटेल यांनी आपल्या टेक ओवो या कंपनीतर्फे एक हजार डबे वितरित करण्यासाठी मदत केली असून त्यापैकी
हनुमान जयंतीनिमित्त साखर भाताचे पाचशे डबे वाटप करण्यात आले.
मूळचे नांदेडचे रहिवासी असलेले साई विनायक अकुरके यांनी प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधून लॉयन्सच्या डब्याची कार्यपद्धती समजून घेतली. लॉक डाऊन मध्ये अडचणीत असलेल्या नांदेडकरांची हनुमान जयंती गोड व्हावी यासाठी त्यांनी ओवो या कंपनीतर्फे
एक हजार डबे वाटप करण्याचा आग्रह धरला.चर्चेअंती सलग दोन दिवस पाचपाचशे डबे वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि नांदेड अन्नपूर्णा तर्फे शंभर टक्के लोकसहभागातून दररोज तीनशे जेवणाचे डबे गरजुंना पुरविण्यात येतात.राम नवमीच्या दिवशी अन्नदात्यांच्या आग्रहामुळे शिरा पूरीचे पाचशे डबे वितरित करण्यात आले होते.रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथील प्रवासी, रस्त्यावरील निराधार तसेच सणासुदीला सुद्धा कर्तव्य बजावत असणारे पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि कोविड योध्दा असलेले माध्यम प्रतिनिधी यांना साखर भाताचे डबे देण्यात आले. याशिवाय लॉयन्सच्या डब्यासाठी नवीन नोंदणी करणाऱ्या मध्ये सत्यव्रत जिंदम व परिवारातर्फे कै. राधाबाई शिवराम जिंदम यांच्या स्मरणार्थ तीनशे व्यक्तींना चार मे रोजी गोड जेवण तसेच कै. शिवमुनीजी वानप्रस्थी शिवराम जिंदम यांच्या स्मरणार्थ तिनशे पंचविस व्यक्तींना अठरा मे रोजी गोड जेवण देण्यात येणार आहे.कै.लक्ष्मीनारायणजी भराडिया यांच्या स्मरणार्थ राजेशकुमार व रवीकुमार भराडिया तसेच सौ.अलका भास्कर रायपत्रेवार,व्यंकटराव भराडे सगरोळी यांच्यातर्फे सात मे रोजी वाटपसाठी प्रत्येकी शंभर डब्याचे योगदान मिळाले आहे.मधुबाला ज्ञानदेव उसनाळे छत्रपती चौक यांच्यातर्फे सत्तर तर स्मिता मुर्तडक धुळे यांच्यातर्फे एकावन डबे मिळाले आहेत.प्रत्येकी पन्नास डबे देणाऱ्या मध्ये अनुश्री चिन्मय वाकोडकर वय तेरा महीने हस्ते जयंतराव वाकोडकर अष्टविनायकनगर,स्व.गणपतराव दाजीबाराव पोकळकर यांच्या स्मरणार्थ पोकळकर परिवार स्वामी विवेकानंद नगर,कमलाकर शामराव करजगावकर, इंजि. महेंद्र सायन्ना मठमवार,साहिल झुंजारे, कै.अतुल काशिनाथ पार्डीकर यांच्या स्मरणार्थ यांचा समावेश आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लॉ. संजय अग्रवाल, लॉ.ॲड. उमेश मेगदे, लॉ. सुनील साबू, लॉ.अरुणकुमार काबरा,लॉ. नागेश शेट्टी,लॉ.धनराजसिंह ठाकूर,
लॉ. अनिल चिद्रावार, लॉ.राजेशसिंह ठाकूर, स्वयंसेवक मनमथ स्वामी, अंबादास जोशी हे परिश्रम घेत आहेत.