डॉ. अनिल कठारे हे अभ्यासू आणि कसलेले इतिहासलेखक होते. नव्या संशोधनात्मक लेखनाची त्यांना पारख होती. ते कधीही चुकीचे संदर्भ इतिहास म्हणून मान्य करीत नसत. कोणत्याही मुद्याच्या तळाशी जाऊन चिंतन करण्याची त्यांना सवयच होती. एखादे पुरातन अस्सल चिटोरे ऐतिहासिक संदर्भ होऊ शकतो असे त्यांचे मत होते. माझ्या ‘संतांनी अस्पृश्यांप्रति काय केले?’ या जळजळीत विद्रोही लेखाला कंधारपूर या त्रैमासिकात छापणारा एक अत्यंत निर्भिड संपादक म्हणून माझ्या हृदयात मानाचे स्थान होते. मी त्यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.
- गंगाधर ढवळे, नांदेड.