सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने गरजू वीटकामगारांना कपड्यांचे वाटप

नांदेड – तालुक्यातील वाजेगाव परिसरातील राधास्वामी सत्संग व्यास नजीकच्या शंभर नंबर वीटभट्टीवर थोर समाजसुधारक व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. तसेच या निमित्ताने गरजू वीटकामगार महिला व पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी साहित्यिक मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, समीक्षक गंगाधर ढवळे, स्तंभलेखक मारोती कदम, संयोजक विशालराज वाघमारे, मनोहर सर्जे, कुणाल भुजबळ, साईनाथ इंजेगावकर, सचिन कदम, घनश्याम विश्वकर्मा, मनोहर सर्जे, धम्मा आढाव, मुकादम एकनाथ भदरगे, निवृत्ती एडके यांची उपस्थिती होती. 

           येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वीटभट्टीवरील काही गरजू वीटकामगार कुटुंबांना म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नव्या कपड्यांचे वाटप करण्यात आले. गतवर्षीही साहित्य मंडळाच्या वतीने कडक टाळेबंदीच्या काळात कामगारांची उपासमार होत असल्याने सर्वच वीटकामगारांना धान्यादी वस्तूंचे कीटचे वाटप करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थितांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष मारोती कदम, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार विशालराज वाघमारे यांनी मानले. 


                      या कार्यक्रमाला महिला वीटकामगार प्रिया गायकवाड, अनुसया कांबळे, उगवता भदरगे, मंगल सोनटक्के, चांगुणा एडके, आशा एडके, माया एडके, रत्नमाला एडके, सोनी गोविंद, शितल गोविंद, शिला सोनसळे, रोशनी गायकवाड, आकांक्षा गायकवाड,  राहुल गायकवाड, गोविंद कांबळे, त्रीसरण भदरगे, अनिल सोनटक्के, सचिन सोनसळे, सूनील एडके, निवृत्ती एडके, सुरेश एडके, रविकिरण एडके, दीपक एडके, सतिश एडके, साहेबराव मेकाले, गोविंद गायकवाड आदी वीटकामगार स्री पुरुषांची उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *