माझा भारत महान….
भारताचे नागरिक याचा आम्हा अभिमान काय सांगू आम्हासाठी
राष्ट्र ध्वजाची हो शान ॥धृ॥
आम्हा आहे अभिमान देश माझा बलवानयाची घेता घेता आन
झाले शहीद जवान ॥१॥
राष्ट्र ध्वजाचं हो गाणंतीन रंगले रंगांन शांती समृध्दी हे दोन
आणखिन समाधान ॥२॥
आम्ही भारती बांधव नित्य गातो जयगानराज्य लोकशाहीचे हे
याचा आम्हा अभिमान ॥३॥
अतिरेकी सावधानमाझा भारत महान इथे नाही चालणार
काही कट कारस्थान ॥४॥
*–निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे
.**शब्दसृष्टी*, मास्तरवाडी, नेहरु नगर,
देवपूर, धुळे. दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.