कंधार येथिल शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारची गाढवावरुन काढली धिंड..


कंधार ; हनमंत मुसळे


    कर्नाटक राज्यातील मानगुली जिल्हा बेळगाव येथील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांनमध्ये संताप्त निर्माण झाला आहे. सर्वत्र कर्णाटक सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे.दि.१० रोजी कंधार शिवसैनिकांच्या वतिने कर्नाटक सरकारची गाढवावर धिंड काढून निषेध करण्यात आला.पोलीसांच्या वतिने  पुतळा जप्त करण्यात आला.शिवसैनिकांनी तहसिलदार यांना निषेधाचे निवेदन दिले.

            हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ग्रामपंचायतची व सबंधित सर्व कायदेशीर पुर्तता करून रितसर परवानगी घेऊन बसविण्यात आलेला होता. पण कुठल्यातरी चुकीचे कर्नाटक सरकारने मराठी माणसाच्या  भावनाचा विचार न करता रातोरात हा पुतळा हटविण्याचे कारस्थान केले. या विरोधात सबंध महाराष्ट्रात  तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. मतदार संघातील लोहा येथे ९ रोजी आदोंलन करून निषेध नोंदविला तर  दि.१० रोजी कंधार तालुक्यातील शिवसैनिकानी कर्नाटक सरकारची प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावर धिंड काढून तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 

 यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाढवास जोडे मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. व त्या ठिकाणी  पुन्हा छत्रपती शिवाजी महाराचांचा पुतळा बसवण्यात यावा अन्यथा पुन्हा कर्नाटक सरकारच्या विरोधात अंदोलन करण्यात येईल अशा ईशारा देण्यात आला.यावेळी माजी आमदार रोहीदास चव्हाण, अॅड मुक्तेश्वर धोंडगे, बाळू पाटील कर्हाळे,निषेध मोर्चाचे आयोजक लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,माजी शहरप्रमुख मारोती पंढरे, पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण,उपसभापती भिमराव जायभाये, जेष्ठ शिवसैनिक रामभाऊ चन्नावार, लोहा तालुकासंघटक स्वप्नील पाटील गारोळे, सुरेश पाटील हिलाल, नगरसेवक आरूण बोधनकर,संभाजी चव्हाण, बाबाराव पाटील शिंदे, पंडितराव देवकांबळे आलू भाई,डी.बी.पाटील,सर्कलप्रमुख तिरूपती घोरबांड, निरंजन वाघमारे, विष्णू जाधव, माणिक दंडवे, अजित तुतरवाड, कैलास पाटील, मनोज गांजरे, मोतीराम पाटील तोरणे, लायक पठाण, व्यंकट कांबळे, पराग कांबळे, बालाजी लोखंडे यांच्या सह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *