कोरोना काळ हा भयंकर काळ आहे.आज सर्वत्र भितीचे वातावरण असताना कंधार येथिल पतंजली योग समितीचे योगशिक्षक निळकंठ मोरे सर गेल्या दिड दोन महिण्यापासुन अॉनलाईन गुगल मिटच्या माध्यमातून शेकडो योगसाधकांना योगाचे धडे देत असून स्वामी रामदेवजी महाराज यांच्या योगाचा प्रचार व प्रसार करुन सर्व मित्रांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नात कधीच कसर न करता योगसाधना करणाऱ्या कंधारचे योगगुरु निळकंठ मोरे यांच्या योगाचा लाभ घेणारे आपल्या प्रतिक्रिया मनातुन देत आहेत..
त्या सर्वांना युगसाक्षी आपल्या हक्क्काचे पिठ (योगसंदेश ) उपलब्ध करुन देत आहे.. युगसाक्षी च्या प्रिय वाचकांनी केवळ प्रतिक्रिया वाचण करुन न थांबता कोरोणा काळात योगसाधना करायची विनंती आहे… संपादक युगसाक्षी
योगवर्गाबद्दल विविध साधकांच्या प्रतिक्रिया* (दि.८ मे २०२१)
इच्छाशक्ती स्ट्रॉंग झाली आत्मविश्वास वाढला — विलास बिरादार (नांदेड )
आपल्या नियमित योगा क्लास मुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. आणि इच्छाशक्ती स्ट्रॉंग होत आहे. आत्मविश्वास वाढतो आहे. आपल्यातील ताणतणाव दूर होतो आहे. संयम राखणे याबाबत वाढ होताना दिसते आहे. विचारात उच्च प्रतीच्या भावना दृढ होत आहेत.मी योगा गेली पंधरा वर्षे झाले करतो आहे.पण त्यात सुसूत्रता नव्हती. आपल्या वर्गाला जॉईन झाल्यामुळे त्यात वाढ झाली.आपले धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे. खरंच योगा क्लासला जॉईन झाल्यापासून खूपच आनंदी झालो आहे. आणि मी आपणास एक विनंती करतो की, आपल्या ग्रुपमधील कमीत कमी दहा योगशिक्षक तयार करावेत. आणखी दोन-चार महिन्यांनी त्यांना सादरीकरण करण्यास संधी द्यावी. म्हणजे जेणेकरून हा ग्रुप कधीच बंद राहणार नाही याची काळजी पण घेतली जावी नम्र ही विनंती.
*—–
योगाच्या सानिध्यात राहुन
मनाला प्रसन्न वाटत आहे -श्री.शिवानंद संग्राम स्वामी (कंधार )
आपल्या सानिध्यात राहुन
मनाला प्रसन्न वाटत आहे.
असचे सदैव आपले सान्निध्य आम्हाला लाभो.हिच नम्र प्रार्थना .तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
अलभ्य हा लाभ । नर देह ऐसा
लाभला तो कैसा । गमविता
मग कोण्या देही। कराल विचार
पहा हो विवेक । करोणिया
याप्रमाणे आपण ज्या तळमळीने ,पोठतिडकीने निःस्वार्थपणे योगमार्गदर्शन करत आहात. याचा सार्थ अभिमान वाटतो.
—–
योग केल्यामुळे माझे दिड किलो वजन कमी – सौ.ज्योती देशमुख (कंधार )
मी ,सहा एप्रिल पासून सतत तुमच्या योग वर्गाला न चुकता सातत्याने उपस्थित आहे. या आधी मी वॉकिंग करायचे पण तेवढा फरक नाही पडला योग केल्यामुळे माझे दिड किलो वजन कमी झाले आहे.आभारी आहे सर.
*—–
बोथट झालेले हत्यार तुमच्या मुळे परत धारदार झाले. – विवेकानंद आंबाटे ( गुंडेवाडी,लोहा)
आम्ही जरी पिवर हत्यार असलो तरीही बसुन जंग चढायला लागतो तेव्हा गरज असते तुमच्या सारख्या काणसाची मग आम्हाला धार येते. माझ्या सारख्या कित्येक जनाच्या बोथट झालेले हत्यार तुमच्या मुळे परत परत धार लावत आहात हत्यार अनेक कानस मात्र एकच निळकंठजी मोरे सर ही अतिशोक्ती नाही हे खरं आहे .
*— करे योग रहे निरोग *
निळकंठ मोरे ,योगशिक्षक
पतंजली योग समिती ,कंधार