कंधार येथिल छत्रपती शिवाजी चौकाचा इतिहास ; भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी उभारले ६२ वर्षापूर्वी कंधारात गनीमी काव्याने छत्रपती

कंधार म्हटले की आठवते चळवळीचा तालूका,या डोंगर-दर्यांत वसलेल्या तालुक्याची कामधेनु म्हणजे मन्याड नदी.पहिल्यांदा मन्याड धरणाचा लढा,तुकाईच्या माळावर धरण करण्याचा संकल्प डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचा.पण झाले उलटे राजकिय व्देशापोटी तत्कालीन नेते शंकरराव चव्हाण यांनी डाॅ.भाई यांचा संकल्प उध्वस्त करत वरवंटचे लोअर मानार प्रकल्प हाती घेतला.त्यास डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील विरोध करतांना साडे तीन हजाराच्यावर सत्याग्रही वीरांनी लढा दिला.

माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे व अन्य सहकार्यांनी त्या लढ्यात सहभागी होवून साथ देत लोअर मानार प्रकल्पास विरोध दर्शविला.सत्तेपुढे लढा हतबल झाला.अप्पर मानार लिंबोटी धरणास अडथळे आणुन कंधार तालुक्याचा राजकिय सूड घेऊन,वरवंट धरण विरोध करून ही पुर्ण करुन जावायाचा लाड पुरविला हे कटुसत्य आहे.या सारखे अनेक लढे डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी त्यांच्या सहकारी कार्यकर्ते यांच्या जीवावर यशस्वी करुन इतिहास घडवून कंधार हा तालूका एक चळवळीचा तालूका नावारूपास आला.

1959 हे वर्ष डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या चळवळीच्या युगातील सुवर्ण वर्ष म्हणून गणल्या जाते.या एकाच वर्षी दर्गातील शिवलिंग पिंडी नांदेडला काढुन दिल्या 20 जानेवारी 1959.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील व्दादशभुजा देवी सापडली.छ.शिवाजी महाराज व म.बसवेश्वर महाराज जयंती महोत्सव आणि श्री व्दादशभुजा देवीचा यात्रा महोत्सव 1959 साली आरंभला.

सर्वात मोठी घटना म्हणजे कंधार शहरात झाशीच्या राणीचा पुतळा बसविण्यासाठी स्मारक ओटा तयार होताच संधीचा फायदा घ्यायचा याचे एक उदाहरण कंधार शहरात घडली.कंधार शहराचे ह्रदयाच असलेले छ.शिवाजी महाराज यांचे स्मारक गनीमी कावा वापरुन निर्माण केले.स्मारका वरील पुतळ्याचे शिल्पकार व डाॅ.भाईंचे सहकारी भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या कलाविष्कारातून छ.शिवप्रभूंचा अर्धपुतळा तयार करुन,
नवरंगपुरा येथील श्री शिवाजी कॉलेज जवळील जगतुंग सागराच्या काठावर काळेश्वरा जवळ शिवगणेश मंदिरात छ.शिवरायांच्या अर्धपुतळ्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठीची मन्याड खोर्‍यातील अथांग जनसागर कंधारच्या ऐतिहासिक चौकात तत्कालीन आमदार कंधार यांच्या नेतृत्वाखालील दाखल झाला.

त्या मिरवणुकीत शिल्पकलेत निपुण भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या समर्थ कलाविष्कारातून साकारलेला छ.शिवप्रभुंचा अर्धपुतळा
जीप मध्ये तयारच होता.प्रशासनाचे सर्व लक्ष त्या शिवगणेश मंदिराकडे लागले होते.आमदार भाई केशवराव धोंडगे यांचे गगनभेदी मन्याडखोरी तोफ निर्भिडपणे धडाडत असताना, भाई धोंडगे यांनी जनतेस भर सभेत प्रश्न विचारला?शिवप्रभुंचा पुतळा या तयार ओट्यावर कसा दिसेल.तेथे उपस्थित जनता-जनार्धन माय-बापांनी एका सुरात होय म्हणत……..एकदम योग्य ठिकाण आहे.आमच्या स्वराज्य संस्थापक जाणता राजाला बसविस.हे वाक्य ऐकून भाई धोंडगे यांच्या मनात असलेले जनतेच्या तोंडातून आपसूकच निघाले.मग काय जल्लोषाला पारावार राहिला नाही.या घटनेचे श्रेय स्वत: न घेता या ऐतिहासिक स्मारकाचे उध्दाटक म्हणुन जनता-जनार्दनला दिले. हा मनाचा मोठेपण आज पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींना दाखवता आला नाही.ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

याच ऐतिहासिक घटणेची कोनशीला म्हणजे या घटनेचा पुरावा क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार, शांतीघाट येथील राष्ट्रकुट भुवन या शिल्प संग्रहालयात पुरावा मला सापडला.ती कोनशीला आपल्या सर्वांना पाहता यावा म्हणुन मला यावर कांहीतरी लेखन करावे असे वाटले यामुळे मागच्या इतिहासाची माहिती सर्वांना व्हावी,हा मुळ हेतु!

     जय महाराष्ट्र 
  स्वराज्य संस्थापक 

श्री शिवाजी महाराज स्मारक
शिवजयंती वैशाख शु.२ श.१८८१
दि .९\५\५९
स्वातंत्र्यसमर शताब्दी-१६\८\५७
संस्थापक व उध्दाटक
जनता-जनार्धन
जय शिवराय
गुरुनाथ कुरुडे
मला वाटते,उध्दाटक म्हणुन जनता-जनार्धन ही देशातले पहिले उदाहरण असावे असे मला वाटते.ज्यांनी गनीम कावा पुतळ्याचे स्मारक करतांना आमदार होते.पण…त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून उध्दाटक म्हणुन जनता-जनार्धन यांना केले.

असा लोकप्रतिनीधी
मन्याड खोर्‍याला लाभणे दुरापास्त आहे.त्यांनी कामे असंख्य केले पण आपल्या हस्ते कधीच कोणती फित कापणे किंवा श्रीफळ फोडले नाही.बर्याच वेळी आपला सखा भाई गुरुनाथराव कुरुडे करावे लावत किंवा त्यांच्या सोबत असनार्या सहकार्यांना देत.हे अजाणबाहु व्यक्तीमत्व बोलके नसून कर्ते होते. डाॅ.भाई धोंडगे यांनी स्मारक गनीमी काव्याने उभारले.त्यांच्या गनीमी काव्या ला मानाचा मुजरा!

हा पुतळा बसविल्यानंतर त्यावर कोनशीला लावतांना कोर्टात जाऊन त्यावर स्टे आणन्याचा प्रयत्न झाला.पण त्या स्मारक ओट्यावर पुतळा बसविला.कोनशीला आता रोकता येत नाही.असे म्हटल्यावर शासनाचे प्रतिनिधी वापस गेले.कोनशीला लावली.कंधार शहरातील ही घटना इतिहासात अजरामर ठरली.डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी अनेक सत्याग्रह अन् मोर्चे काढले.त्यांचे साक्षीदार हे कंधारचे शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक शिवाजी चौक आहे.महाराष्ट्रातच काय संपुर्ण देशात अगणित सत्याग्रह व मोर्चा काढल्या नंतर मुलुखमैदानी भाषणे झाली.जणुकांही ही श्रोत्यांना विचार ऐकण्याची पर्वणीच होती.

कंधार नगर परिषदेने १५ ऑगस्ट १९७० रोजी हे शिवस्मारक पुर्णाकृती शिवप्रभुंचा रुबाबदार पुतळा ओरंगाबादचे शिल्पकार मंडलगेकर यांच्या समर्थ कलाविष्कारातून निर्मित होवून त्या स्मारकावर खालील कोनशीला लावण्यात आली.
जय महाराष्ट्र..!जय शिवराय..!जय क्रांती.!
श्री शिवस्मारक समिती ता.कंधार
स्वराज्य संस्थापक छ.शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याचे अनावरण
समारंभ
दि. १५ ऑगस्ट १९७०
आमदार श्री केशवराव धोंडगे
यांच्या शुभहस्ते
नगराध्यक्ष
श्री राजेश्ववरराव आंबटवाड
यांच्या अध्यक्षतेखाली झाला.


कंधारच्या ऐतिहासिक शिवाजी चौकात छ.शिवप्रभु स्मारकावर विराजमान झाले कसे हा इतिहास आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावा यासाठीच…

dattatrya yemekar

दत्तात्रय एमेकर गुरुजी,

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *