लोहा प्रतिनिधी शैलेश ढेबंरे
प्रधानमंत्री पिक योजना खरीप हंगाम 2020-21 या वर्षाचा पिक विमा जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच तालुक्याला मंजुर झाला असुन लोहा हा पिक विमा योजना पासुन दुरच राहिला आहे
लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता . या वर्षी सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांचे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाली यात प्रामुख्याने कापूस सोयाबीन मूग उडीद ज्वारी पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले त्यानुसार महसूल विभागाने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे.
नुकताच नांदेड जिल्ह्यात पिक विमा मंजूर झाला आहे परंतु पिक विमा कंपनीने पिक विमा मंजूर करताना लोहा तालुक्यावर अन्याय केला आहे लोहा तालुक्यातील खरोखर पूर्णपणे नुकसान झालेले आहे तरी त्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून पिक विमा येत्या आठ दिवसात मिळवुन द्यावे अन्यथा धर्मवीर शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल व यात काही हानी झाली तर त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असं लोहा
तहसिलदार साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी धर्मवीर शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष लखन देशमुख मोरे ,उपजिल्हाध्यक्ष अंगद पाटील मडकीकर, शैलेश पाटील ढेबंरे ,योगेश पाटील घोरबांड आदीची यावेळी उपस्थिती होती.