लोह्याच्या पीक विम्यासाठी आ. शामसुंदर शिंदे यांनी मंत्रालयात कृषी मंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन
लोहा,( प्रतिनिधी)
लोहा तालुक्याला पिक विमा कंपनीच्या चुकीमुळे पीक विमा मिळाला नसल्याने तालुक्यतील शेतकऱ्यांमध्ये पीक विमा कंपनी विषयी त्रिव नाराजी व संताप पसरला असून पीकविमा कंपनी ने तालुक्यतील शेतकऱ्यावर अन्याय केला आहे या पार्श्वभूमीवर लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांनी काल बुधवार दिनांक 19 मे रोजी मंत्रालय मुंबई येथे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ मंजूर करावा म्हणून कृषी मंत्र्यांना निवेदन दिले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020-21 योजनेअंतर्गत लोहा तालुक्यामध्ये 140576 शेतकऱ्यांनी 60513.47 हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविला होता, लोहा तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका असून माहे सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, लोहा तालुक्यातील प्रामुख्याने सोयाबीन, मूग ,उडीद ,कापूस व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे, जिल्ह्यात विमा कंपनीने पिक विमा मंजूर केला असून विमा कंपनीकडून काही तालुक्यावर अन्याय केला आहे, ज्या तालुक्यांमध्ये सिंचन सुविधा पुरेशी आहे अशा तालुक्यांना विमा कंपनीने पिक विमा मंजूर केला असून लोहा तालुका हा अवर्षणग्रस्त असूनही लोहा तालुक्यातील शेतकऱ्यावर पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यावर विमा कंपनीने अन्याय केल्याचे आमदार शिंदे यांनी निवेदनात नमूद केले असून कृषी मंत्री दादा भुसे यांनी या गंभीर प्रकरणी लक्ष देऊन लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार शिंदे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे, यावेळी मंत्रालयात कृषी मंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी आमदार शिंदे यांनी लोहा तालुक्याला पिक विमा तात्काळ मंजूर करावा या मागणीसाठी सविस्तर चर्चा केली ,
यावेळी कृषी मंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांनी लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली असल्याचे आमदार शिंदे यांना सांगितले ,कृषी मंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ डवले यांनी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ मंजूर करण्यासाठी योग्य ते निर्देश दिले असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.