नांदेड ; प्रतिनिधी
लॉयन्सच्या डब्याची यंत्रणा पाहण्यासाठी खास हैदराबाद येथून जायस्वाल परिवार नांदेडला आले असून त्यांनी गुरुवारी डबे वितरणाची प्रक्रिया पाहून धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्याकडे समाधान व्यक्त केले.
गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर लॉयन्सच्या डब्याची चर्चा पाहून हैदराबाद येथील स्नेहलता जायस्वाल यांनी संयोजक दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. डबा वितरण करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली. गुरुवारी जायस्वाल परिवारातील सहा सदस्य नांदेडला आले. त्यांनी डबा बनविण्याची तसेच वितरणाची व्यवस्था प्रत्यक्ष पाहिली.सर्व पाहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
रेल्वे स्टेशन वर जायस्वाल परिवाराच्या हस्ते तर बस स्थानकावर तिसरा वाढदिवस असलेल्या कु. रेवा गहेरवार हिच्या हस्ते डब्याचे वितरण करण्यात आले.लॉयन्सच्या डब्यामध्ये बुधवारी ऋजित मिलिंदराव पुराणिक विवेकनगर ,गौतम धोका जैन यांनी प्रत्येकी १०० डबे दिले आहेत. डॉ. रघुनाथ विष्णुपंत देशपांडे व सौ. सुशीला यांच्या लग्नाचा साठावा वाढदिवस, डॉ. मनीष देशपांडे सौ. सुचिता यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस,कै.रामगोपालजी बालमुकुंदजी बियाणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मदनलाल बियाणी सराफा ,मैत्रिण ग्रुप नया मोंढा,अक्षज राहुल आलूरकर,गुप्तदान,कै.संदेश माधव जाधव यांच्या स्मरणार्थ अनुदत्त रायकंठवार ,अरविंद दिगंबरराव चौधरी ,नेताजी पंडितराव ढवण धाराशिव,कै.यमुना रेनकुंटवार यांचे स्मरणार्थ ,सतीश सुगनचंदजी शर्मा प्रॉपर्टी ब्रोकर फरांदेनगर या सर्वांनी पन्नास पन्नास डबे दिले आहेत. गुरुवारच्या अन्नदात्यांमध्ये कु. रेवा हिच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सौ रोहिणी व विक्रांत गहेरवार यांच्याकडून,विजयकुमार धारासूरकर व वर्षा धारासूरकर लग्नाच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त,
कै.अनिल मालक लव्हेकर यांच्या स्मृतीत तसेच शंकरराव सुत्रावे धर्माबाद यांच्यातर्फे प्रत्येकी १०० डबे देण्यात आले. याशिवाय प्रत्येकी ५० डबे देणाऱ्यांमध्ये ॲड. संजय जामकर,सुभाष सालेवार, प्राजक्ता आलुरकर,मोनिका बिस्वजीत दास,
कै.मीना मधुकरराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ,कै.कोंडीबा व्यंकोबा अनंदास यांच्या स्मरणार्थ वितरण डबे करण्यात आले. डबे वितरण करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत अरुणकुमार काबरा,दिनेशसिंह ठाकूर,सुरेश शर्मा, संतोष ओझा, प्रशांत पळसकर ,कामाजी सरोदे यांनी परिश्रम घेतले.