.
माळाकोळी ;एकनाथ तिडके
मागील अनेक वर्षापासून पर्यावरण या विषयावर काम करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक संस्था भिवराई फाउंडेशन यांनी एक अनोखा उपक्रम राबवत वागदरवाडी येथे महाराष्ट्रातील पहिले “पर्यावरण किर्तन ” कार्यक्रम आयोजित केला आहे , पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण कीर्तन ही संकल्पना गाव पातळीवर ऋजू करण्याचा प्रयत्न चालवला आहे, भिवराई फाऊंडेशनचे संस्थापक परमेश्वर केंद्रे यांनी आजपर्यंत पर्यावरण रक्षणासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे त्यांनी “पृथ्वी वाचवा” या यूट्यूब चैनल द्वारे जनजागृती मोहीम उघडली आहे ,यासाठी त्यांनी लघुपट , व्हिडिओ बनवले शिवाय प्रत्यक्ष वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त असे उपक्रम राबवले आहेत . भिवराई फाउंडेशनच्या एक कोटी वृक्ष लागवड या उपक्रमाला पर्यावरण दिनी वागदरवाडी येथे वृक्षारोपण करून जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांच्या हस्ते सुरुवात होत आहे.