घरकुलाचे बिल काढण्यासाठी पैसे घेत असलेल्या कंधार पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना निलंबीत करा ; माजी सैनिकांनी गटविकास अधिकारी यांनाच धरले धारेवर

कंधार ; प्रतिनिधी

कंधार पंचायत समिती कार्यालयात दिवसेंदिवस मनमानी व अनागोंदी कारभार चालत असुन पैसे घेतल्या शिवाय कामच होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.शासन गोरगरीब जनतेला निवारा मिळावा यासाठी घरकुल देत आहेत परंतु घरकुल मजुंर करण्या पासुन ते बांधेपर्यत आधिकारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने माजी सैनिक संघटनेच्या वतीने घरकुलच्या कामात कोणीही पैसे देऊ नये व गैरव्यवहार करू नये अशा प्रकारचे निवेदन दिले होते.परंतु येथिल अधिकारी यांनी फारशी दखल घेतली नाही.काही दिवसापुर्वीच येथिल कर्मचारी यांनी एका लाभार्याकडुन पैसे घेत असताना रंगेहाथ पकडले होते.या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याकडे पुरावा सादर करून तक्रार केली होती परंतु गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाकडे कसल्याच प्रकारचे गांभीर्याने घेतले नसल्याने दिनांक 14 जुन रोजी माजी सैनिक संघटनेचे बालाजी चुकलवाड जिल्हाध्यक्ष ,अर्जुन कांबळे तालुका अध्यक्ष ,शेख आजीज तालुका उपाध्यक्ष,पोचीराम वाघमारे तालुका सचिव यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गटविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.

कंधार पंचायत समिती कार्यालय हे भ्रष्टाचारांचे केंद्र बनले आहे. गटविकास अधिकारी यांचे कर्मचार्‍यांवर वचक नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार आहे चालू आहे. प्रत्येक कामासाठी येथील कर्मचारी व अधिकारी हे पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहे. काही दिवसापूर्वी घरकुल चे बिल काढण्यासाठी येथील कर्मचारी पैसे घेत असताना माजी सैनिक संघटनेच्या वतीने या कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले होते. यासंदर्भात माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे या कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. परंतु याकडे गटविकास अधिकारी यांनी कसल्याच प्रकारची दखल न घेतल्याने आज माजी सैनिक चांगलेच आक्रमक होऊन गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *