लसीकरणामूळे मृत्यूचा धोका? : नगण्य!

देशात करोना लस दिल्यानंतर झालेल्या पहिल्या मृत्यूची खात्री पटली आहे. लशीमुळे एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने गठित केलेल्या पॅनेलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. लसीकरणानंतर गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. केंद्र सरकारने AEFI साठी समिती गठीत केली आहे. या समितीने लसीनंतर ३१ मृत्यूंचे आकलन केल्यानंतर, लस घेतल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसमुळे ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. ही एक प्रकारची अ‍ॅलर्जी आहे. वृद्धाला लशीचा पहिला डोस ८ मार्च २०२१ रोजी मिळाला होता आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. AEFI समितीचे चेअरमन डॉ. एनके अरोरा यांनी लशीमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

लशीमुळे आणखी तीन मृत्यू लशीमुळे झाल्याचे मानले जात आहे. परंतु अद्याप याची पुष्टी होणे बाकी आहे. सरकारी समितीच्या अहवालात असे म्हटले आहे की, आता लशीशी संबंधित ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याची अपेक्षा आधीचं होती, जी सध्याच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे लसीकरणास जबाबदार ठरू शकते. या प्रतिक्रिया अ‍ॅलर्जीशी किंवा अ‍ॅनाफिलेक्सिससारखे असू शकतात. अहवालात सांगितले गेले की, अ‍ॅनाफिलेक्सिसचे दोन प्रकरण आणखी समोर आले होते. या दोन लोकांना १६ जानेवारी आणि १९ जानेवारी रोजी लस दिली होती. हे दोघे होते. यामध्ये एक २२ वर्षांचा आणि एक २१ वर्षांचा होता. या दोघांना वेगवेगळी लस देण्यात आली होती. रुग्णालयात भरती केल्यानंतर दोघे बरे झाले.

हजार जणांमीध्ये एकाला ही अ‍ॅलर्जी होते.

लसीकरणानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार आवश्यक आहेत. ३० हजार ते ५० हजारांपैकी एकाला अ‍ॅनाफिलेक्सिस किंवा तीव्र अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसतात, हे लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्यावे.” करोना महासाथीच्या आजाराचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगभरातील सर्वाधिक बाधित आणि मृतांची संख्या अमेरिकेत नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेत करोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण सुरू असताना बाधितांच्या मृत्यूचा आकडा सहा लाखांवर पोहचला आहे. मात्र, लसीकरणामुळे मृत्यू दरात घट झाली असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेत मागील ११३ दिवसांमध्ये एक लाख जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे ‘रॉयटर्सने’ म्हटले आहे. याआधी अवघ्या ३५ दिवसांमध्ये मृतांचा आकडा चार लाखांहून पाच लाखांपर्यंत पोहचला होता. अमेरिकेत वेगाने होत असलेल्या लसीकरणामुळे मृतांचा दर घटला असल्याचे म्हटले जात आहे. करोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारी माहितीच्या आधारे सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या आखडेवारीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू झालाय. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. वैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला अ‍ॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असं म्हटलं जातं. लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये अशाप्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे.

आकडेवारी पाहिल्यास लसीकरणामुळे मृत्यू झालेल्याचं प्रमाणात फारच कमी आहे. देशामध्ये ७ जूनपर्यंत २३ कोटी ५० लाख जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये एईएफआयची एकूण २६ हजार २०० प्रकरणं समोर आली आहेत. म्हणजेच टक्केवारीत सांगायचं झालं तर केवळ ०.०१ टक्के लोकांना लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत.

पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलेले देशातले सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. के. अग्रवाल यांचं सोमवारी निधन झालं. त्यांना कोरोना संसर्ग झाला होता आणि दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाविरोधातली ही लढाई ते हरले आणि सोमवारी त्यांचं निधन झालं. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि दुसरा डोस घेऊन 15 दिवसही झाले होते आणि तरीही त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्याचा शेवट इतका दुःखद झाला.

देशात कोरोनावर सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी उपलब्ध आहेत. स्पुटनिक V लवकरच उपलब्ध होईल. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सध्या एकमेव प्रभावी उपाय असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. लशीप्रती शंका निर्माण करणं, हा या रिपोर्टचा उद्देश नाही. तर लस घेतल्यानंतरही खबरदारीच्या सर्व उपायांचं पालन करणं गरजेचं आहे, हा या रिपोर्टचा हेतू आहे.

कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं?
कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी लस घेता येते?
मासिक पाळी आली असताना कोरोना लस घेऊ शकता का?
कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकार आणि लस निर्मात्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार लसीचे दोन डोझ घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोनाचा संसर्ग झाला तर हॉस्पिटलमध्ये जाण्याची, आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची गरज भासत नाही.

कोव्हिशिल्ड लस निर्मात्या अॅस्ट्राझेनकाच्या वेबसाईटवरही, “लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये लस कोव्हिड-19 आजाराचा गंभीर संसर्ग, हॉस्पिटलमध्ये भर्ती होणे आणि मृत्यूपासून 100% बचाव करत असल्याचं आढळून आलं आहे”, असा दावा करण्यात आला आहे.

आणि म्हणूनच लस घेतल्यानंतरही कोव्हिड संसर्ग होणारेही लसीचं समर्थन करत होते. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनामुळे मृत्यू झालेले डॉ. के. के. अग्रवाल एकटे नाहीत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यापैकी किती डॉक्टर्सने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते, याची माहिती देण्यात आलेली नाही.

इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र सरकारने 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आलं. त्यामुळे बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लशीचे दोन्ही डोस दिले गेले असावे, असे मानता येईल.

केंद्र सरकारचं म्हणणं आहे की, त्यामुळे लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मृत्यूची शक्यता आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. भारतात आतापर्यंत असे किती मृत्यू झाले आहेत? मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारण्यात आला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होतो. लस इफिकसीच्या डेटावरूनही लक्षात येतं. देशात अशी प्रकरणं अगदी मोजकी आहेत. आयसीएमआरने यापूर्वी अशाप्रकारच्या संसर्गाचा डेटा जाहीर केला आहे. लसीकरणानंतरही ज्यांचा मृत्यू झाला त्यांना विषाणूच्या कोणत्या व्हॅरिएंटची लागण झाली होती? त्यांना संसर्गाआधीच सहव्याधी (इतर काही आजार) होती का? लसीकरणानंतर त्यांची दिनचर्या, इतरांना भेटणं या सगळ्या बाबी कशा होत्या? ते कुठला व्यवसाय करायचे? एक्सपोजर कुणाचं होतं?, या सर्वांची माहिती घ्यायला हवी.

कोव्हिशिल्ड लस विषाणूच्या 1.351 या व्हॅरिएंटची (याला दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट म्हणूनही ओळखतात) कमी गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर परिणामकारक नसल्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत. दक्षिण आफ्रिकेत 2000 तरुणांवर लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, या चाचणीनंतर दक्षिण आफ्रिकेने अॅस्ट्राजेनकाच्या कोव्हिशिल्ड लसीचा वापर थांबवला.

भारतात असं का घडतंय, याचं कुठलंही स्पष्टीकरण सरकारने अजून दिलेलं नाही. कदाचित लसीकरणानंतरही एखाद्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या नसाव्या
दुसरी शक्यता अशीही आहे की अँटीबॉडीज तयार झाल्या पण विषाणूचा मुकाबला करता येईल, एवढ्या त्या सक्षम नव्हत्या.
किंवा लस घेतल्यानंतर तयार झालेल्या अँटीबॉडीज ज्या व्हॅरिएंटचा संसर्ग झाला त्या व्हॅरिएंटवर परिणामकारक नसतील.

16 जानेवारी ते 7 जून दरम्यान लसीकरणानंतर झालेल्या 488 मृत्यूचा संबंध हा कोरोनानंतरच्या त्रासाशी जोडण्यात आला होता. मात्र भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनं मंगळवारी हा दावा फेटाळला असून, या बातम्या ‘अपूर्ण’ आणि ‘मर्यादित माहिती’ वर आधारित असल्याचं स्पष्ट केलं आहे. आरोग्य मंत्रालयानं आवर्जून याबाबत माहिती दिली की, तोपर्यंत (7 जून) 23.5 कोटी नागरिकांचं लसीकरण झालेलं होतं.

लशीचा डोस घेतलेल्या 23.5 नागरिकांमध्ये मृत्यूचा आकडा हा 0.0002 टक्के एवढा आहे. एका ठराविक लोकसंख्येमध्ये होणार्या अपेक्षित मृत्यूपेक्षा हा आकडा कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मृत्यूचा दर हा ठरलेला असतो. एसआरएसच्या माहितीनुसार 2017 मध्ये मृत्यूदर हा 1000 लोकांमागे 6.3 एवढा होता, असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

यात आणखी एक महत्त्वाची आणि सध्याच्या घडीला अनुसरून असलेली बाब म्हणजे, कोरोना विषाणूमुळं होणाऱ्या मृत्यूचा दर हा एक टक्क्यापेक्षा अधिक असून लसीकरणामुळं हा आकडा कमी करता येऊ शकतो. त्यामुळं कोव्हिड-19 मुळं होणाऱ्या मृत्यूच्या आकड्याचा विचार करता, लसीकरणामुळं होणाऱ्या मृत्यूचा धोका हा हा नगण्य आहे, असं आरोग्य मंत्रालयांनं स्पष्टपणे म्हटलं आहे.

संपादकीय

गंगाधर ढवळे,नांदेड

(मानद संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page