डेल्टा + म्हणजे तिसरी लाट?

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. या काळात आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराने डोकं वर काढलं आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळून आलेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. तसंच बाजारपेठांमध्येही तुफान गर्दी करताना नागरिक दिसताहेत. त्यामुळे डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारनं जारी केलेली अनलॉकची पाच टप्प्यातील पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. तसंच दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येतील, असेही संकेत देण्यात आलेत. कोरोनाची ब्रेक द चेन यासाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्याच्या अनलॉक पद्धतीत राज्य सरकारकडून बदल करण्यात येईल. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांत अधिक कठोरता आणून अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात याबाबतची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत.

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

होय! शरीरातील अँटीबॉडी किती असतात त्याची पातळी ओळखली जाऊ शकते. जेव्हा लसीची चाचणी होते तेव्हा लस किती प्रमाणात अँटीबॉडी बनवते पाहिले जाते. मात्र याबाबत सामान्य व्यक्तींनी जाणून घेण्याची गरज नाही. आपल्या शरीरात विषाणूंविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होत असतात.

मुलांना लस चाचणीसाठी आमंत्रित केले जाते. मात्र ते मूल निरोगी असावे, त्याला कोणतेही शारीरिक आजार असू नये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाच्या पालकांनी त्या बाबात सहमत असले पाहिजे. त्यांना लसीबाबात सर्व माहिती दिली जाते. ही लस मुलांना देण्यापूर्वी अनेक चाचण्यांमध्ये गेलेली असते. त्यामुळे लसीच्या सुरक्षिततेविषयी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाच महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा नवीन ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट आढळून आलाय. रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणाऱ्या या व्हेरियंटची महाराष्ट्रात 21 रुग्णांना पहिल्या टप्प्यात लागण झाली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. या व्हेरियंटने ग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला. त्यांचं लसीकरण झालं होतं का, कोरोनाची पुन्हा लागण झाली होती का? ही माहिती गोळा केली जात आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास ‘डेल्टा’ व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. कोरोना व्हायरसमधील डबल म्युटेशन सर्वात आधी महाराष्ट्रात आढळून आलं होतं.

देशात कोव्हिड-19 ची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत असतानाच ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरू शकतो का? याचे उत्तर होय असे आहे.
कारण महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट आढळून आल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे.

रत्नागिरीत ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचे सर्वात जास्त 9 रुग्ण
जळगावात 7 रुग्णांना ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती आहे. मुंबईत 2 रुग्णांना ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झाला होता. पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. डेल्टा प्लस’ व्हेरियंटने ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू कऱण्यात आली आहे. त्या दृष्टीने डेल्टा प्लस’ व्हेरियंटच्या तपासासाठी राज्यभरातून 7500 नमुने पाठवण्यात आले होते.

सूक्ष्म जीवशास्त्रज्ञांच्या मते, कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हारस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. “डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे, नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला. डेल्टा प्लस’ व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आलंय, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

भारतात सर्वात पहिल्यांदा आढळून आलेल्या ‘डेल्टा व्हेरियंट’चं शास्त्रीय नाव B.1.617.2 आहे. त्यानंतर डेल्टा व्हेरियंटमध्ये हळूहळू बदल होत गेले. ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट’चं शास्त्रीय नाव B.1.617.2.1 असं आहे. ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट’ कसा तयार झाला याची माहिती देताना, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल सांगतात, “कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी ‘डेल्टा व्हेरियंट’ कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन (बदल) झाल्याचं आढळून आलं. याला ‘डेल्टा प्लस’ किंवा ‘AY.1’ असं नाव देण्यात आलं.”

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पुढे सांगतात, “mRNA व्हायरसची संख्या वाढताना (replication) त्याच्या मूळ रूपात बदल होतो. ज्यामुळे विषाणूला नवीन रूप प्राप्त होतं. काहीवेळा म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये होतं. केंद्राच्या माहितीनुसार, ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट सर्वात पहिल्यांदा युरोपमध्ये आढळून आला होता. आजाराच्या दृष्टीने व्हायरसचं म्युटेशन कुठे झालं हे फार महत्त्वाचं आहे. स्पाईक प्रोटीनच्या मदतीने व्हायरस शरीरातील पेशींना चिकटतो. त्यामुळे व्हायरसमध्ये झालेला बदल आपल्यासाठी प्रतिकूल ठरू शकतो. त्यामुळे म्युटेशन झालेले व्हेरियंट चिंतेचा विषय असतो.

देशात डबल म्युटंट महाराष्ट्रातूनच पसरला. त्यामुळे, डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्याने, चिंता अधिक वाढली आहे.

देशात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात, डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून येणं हा धोक्याचा इशाराच आहे. “कोरोनाव्हायरसचा हा व्हेरियंट किती संसर्गजन्य आहे. रुग्णांना झालेला संसर्ग तीव्र आहे का. यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. हा व्हेरियंट राज्यात मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा पुरावा मिळालेला नाही. यावर संशोधन सुरू आहे.” तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोव्हिडचा हा नवीन व्हेरियंट किती धोकादायक आहे. हे आपल्याला पुढील काही दिवसात समजून येईल.

डेल्टा प्लस हा डेल्टा व्हेरियंटमधून तयार झाला आहे. डेल्टा व्हेरियंट लस घेतल्यानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला चकवा देतो हे सिद्ध झालंय. त्यामुळे, डेल्टा प्लसही रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहेत. डेल्टा प्लसचा लशीवर परिणाम होतो का याबाबत 3-4 दिवसात माहिती दिली जाईल. कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य डेल्टा व्हेरियंटमुळे पसरली होती. “संशोधकांच्या माहितीनुसार, ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटची संसर्ग पसरवण्याची क्षमता पहिल्यापेक्षा अधिक वाढली आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट चिंता करण्यासारखा नक्कीच आहे. त्यामुळे, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पहिजे. सध्या तरी हा व्हेरियंट डेल्टापेक्षा वेगळा असेल असं मानण्यासाठी काही ठोस कारण नाही. तज्ज्ञांच्या माहितीनुसार डेल्टा व्हेरियंटप्रमाणेच डेल्टा प्लस रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे. कोरोनाविरोधी लस आणि संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती दोघांनाही चकवण्याची क्षमता ‘डेल्टा प्लस’ असण्याची शक्यता आहे.”

कोरोनासंक्रमित रुग्णांवर उपचारासाठी अँटीबॉडी कॉकटेलला आपात्कालीन वापराची मंजूरी देण्यात आली आहे. मुंबई, दिल्लीतील काही रुग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल देऊन उपचार करण्यात आले आहेत. पण, संशोधकांना भीती आहे की, डेल्टा प्लस व्हेरियंट अँटीबॉडी कॉकटेलवर प्रभावी ठरणार नाही.
मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी ठरणार नाही असा दावा केला जातोय. पण, अॅन्टीबॉडीज कॉकटेलच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंटवर त्या प्रभावी ठरल्या पाहिजेत. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट अजूनही “Variant of Concern” म्हणजेच चिंता करण्यासारखा मानण्यात आलेला नाही.

कोरोना व्हायरसच्या या नवीन व्हेरियंटवर लक्ष ठेवावं लागेल. शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा लागेल. विषाणूमध्ये होणारे बदल थांबवता येणार नाहीत. त्यामुळे यांच्यात होणारे बदल आणि उपाययोजना यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल.”

युकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरातील 10 देशांमध्ये डेल्टा प्ल्स व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यात भारत, अमेरिका, युके, कॅनडा, जर्मनी, रशिया, जपानसारख्या देशांचा समावेश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेडेट बायोलॉजीचे (IGIB) शास्त्रज्ञ विनोद स्कारिया यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, आतार्यंत जिनोम सिक्वेंन्सिंग करण्यात आलेले डेल्टा प्लस व्हेरियंटचे नमुने युरोप, आशिया आणि अमेरिकेतील आहेत.

युकेमध्ये डेल्टा प्ल्स व्हेरियंटचे 36 रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. यातील दोन रुग्णांचे नमुने लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी घेण्यात आले होते.

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरा लाट येण्याची शक्यता आहे, यासंबंधीचे अद्याप कोणतेही पुरावे नसल्याचं तज्त्रांनी म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च जीनोम सिक्वेंसर याचं असं म्हणणं आहे की, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार असल्याचा कोणताही पुरावा नाही.

देशातील बर्‍याच भागात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेत. मात्र देशातील टॉप डॉक्टर आणि जीनोम सिक्वन्सर्सनी अशी भीती निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या या उत्परिवर्तित स्वरूपाचा तिसर्‍या लाटेशी काही संबंध नाही.

तिसऱ्या लाटेची आतापासून काळजी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या लाटेवर लक्ष द्यायला हवं. देशातील दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत निष्काळजीपणा करु नये. त्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, याबाबतचे अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. आपल्याला अजूनही सतर्क राहावं लागणार आहे. सर्व कोरोनाचे नियम पाळावे लागतील. अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे ही सर्वात मोठी चिंता देशासमोर आहे. तसंच डेल्टाचा कोणताही व्हेरिएंट भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचंही ते म्हणालेत.

नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या असलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा पेक्षा धोकादायक आहे किंवा या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते असं कोणतेही पुरावे नाहीत.

संपादकीय

गंगाधर ढवळे,

मानद संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page