कंधार- प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा 20/08/2019 च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी सामाजीक अर्थसहाय्य योजनेच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ /विधवा/ दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. मागील वर्षी कोवीड-19 मुळे उत्पन्नाचे प्रमाणपत्रास शासनाने सुट दिलेली होती परंतु या वर्षी तसे आदेश अदयाप पर्यत अप्राप्त आहे. त्यामुळे 30 जुन पर्यत हयात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
लाभार्थीना ज्या बॅक/ पोस्टाच्या शाखेवर अर्थसहाय्य उचलतात त्या बॅकेकडे/पोस्टाकडे हयात प्रमाणपत्र सादर करावे. तसे शक्य नसल्यास संबंधीत तलाठी/मंडळ अधिकारी कडे सुध्दा हयात प्रमाणपत्र जमा करता येईल तसेच तहसील कार्यालयातही सकाळी 11 ते 3 या वेळेत 30 जुन पर्यत हयात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी संगांयो विभागात एक खिडकी कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असून संगांयो विभागाचे श्री बारकुजी मोरे यांना या कामी सहाय्य करण्यासाठी एक अतिरिक्त कर्मचारी श्रीमती स्वप्नजा पांचाळ यांची या कक्षात नियुक्ती तहसिलदार
व्यंकटेश मुंडे यांनी केली आहे.