कंधार ; प्रतिनीधी
उपविभागीय कार्यालय लातूर चे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी आज दिनांक 24 जून रोजी शेकापुर येथील महात्मा फुले विद्यालय येथे भेट दिली.विद्यालयाच्या वतीने उपसंचालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन अनोखा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिड दोन वर्षापासुन शाळा बंद आहेत. या वर्षी शासनाने विद्यार्थ्यांविना शाळा चालु करुन शाळेत दहावी बारावी वर्गाला शिकवणा-या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक केली असल्याने शाळा उघडल्या आहेत. शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे हे नांदेड दौऱ्यावर असताना दि.२४ जुन रोजी शेकापुर येथील शाळेचा आढावा घेण्यासाठी सदिच्छा भेट देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या .
लातूरचे शिक्षण उपसंचालक हे महात्मा फुले शाळेत येणार असल्याचे समजताच महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूरचे संस्थाचालक संभाजी पाटील केंद्रे, सचिव शिवाजीराव केंद्रे ,सहसचिव रेखाताई केंद्रे, प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांनी उपसंचालक गणपतराव मोरे यांच्या हस्ते महात्मा फुले विद्यालयात वृक्षारोपण करून अनोखे स्वागत केले .
सत्कार सोहळा याप्रसंगी बोलताना उपसंचालक गणपतराव मोरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचालक संभाजी पाटील केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ वंदना फुटाणे शिक्षण निरीक्षक उपसंचालक कार्यालय लातूर ,प्राध्यापक बोकारे, प्राध्यापक चाटे हे उपस्थित होते.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात गणपतराव मोरे बोलताना म्हणाले की,या शाळेला संस्थाचालक संभाजी पाटील केंद्रे यांनी महात्मा फुले विद्यालय हे नाव दिले आहे.या शाळेला ज्या महात्मा फुले या महापुरुषाचे नाव देण्यात आले आहे त्याच महापुरुषाच्या नावाप्रमाणे शाळा चालत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन मिळाले नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे देशातील नागरीकांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे.आज वट पोर्णीमा आहे त्यामुळे महिला या वडाच्या झाडाची पुजा करत असतात वडाचे झाड हे शंभर टक्के आॕक्सिजन देणारे झाड असल्याने प्रत्येक महिलांनी हे झाड लावले पाहीजे.असे आहवान करून महात्मा फुले विद्यालय व त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले.
यावेळी बालशौर्य राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कामेश्वर वाघमारे यांचा सत्कार शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रर्यवेक्षक वसंतराव केंद्रे, मोहित केंद्रे ,व्यंकट पुरमवार ,लोंड अमित ,सौ सुनिता इप्पर मॕडम प्रा.स्वाती रत्नगोले मॅडम, चंद्रकांत पडलवार , सुर्यकांत श्रीमंगले ,शेख एम.एम. , अनिल बोईवार ,शिवाजी मेंडके ,प्रा.देविदास जायभाये ,प्रा.सीर्यकांत गुट्टे ,प्रा.गिरीश नागरगोजे ,प्रा.गोविंंद आडे ,प्रा.विजय राठोड ,प्रा.मोतिराम नागरगोजे ,प्रा.भारतलाल सुर्यवंशी ,किशन ठोंबरे ,प्रा.हाणमंत भालेराव,महेंद्र बोराळे ,बालाजी केंद्रे ,संभु वाघमारे एस.पी.केंद्रे आदी सह सर्व प्राध्यापक , शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.