कंधार ; प्रतिनिधी
तत्कालीन पंतप्रधान प्रियदर्शनी इंदीरा गांधी यांनी आणीबाणी लादली.त्यावेळी आणीबाणीच्या काळात स्वातंञ्य सैनानी संभाजी केंद्रे यांनी आणीबाणीचा विरोध केला.आज त्या 25 जुन 1975 रोजी च्या काळाकुट दिवसाचा सर्वत्र निषेध होत आहे. आणीबाणीचा विरोध म्हणून अनेकांनी दिड दोन वर्षाचा कारावास भोगला होता.त्यामुळे आज 25 जुन रोजी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंञ्य सैनिक संभाजीराव पाटील केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला .
प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे ,पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे , यावेळी मा.प्रा.मुंजाजी शिंदे ,प्रा.पंडीतराव गित्ते , रामराव वरपडे ,व्यकटराव पुरमवार ,प्रा.अरूण केदार ,प्रा.सुर्यकांत गुट्टे ,सौ.सुनिता इप्पर मँडम ,प्रा.स्वाती रत्नगोले मँडम ,प्रा.गिरीश नागरगोजे अदिसह सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.