औरंगाबाद -येथील स्व.विलास इनामदार हे दै.लोकमतमध्ये वरीष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत होते. 11 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचे रेल्वेने प्रवास करताना अपघात झाल्याने दुर्देवी निधन झाले. पदवीधर आ. सतीशराव चव्हाण हे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदा अथवा विविध विषयांच्या निमित्ताने त्यांची व विलासची नेहमी भेट होत असे. विलासचे निधन झाले तेव्हा त्याचा मुलगा श्रवण इयत्ता आठवी वर्गात शिकत होता.
तेव्हापासून श्रवणच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्विकारली होती. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सध्या तो इलेक्ट्रॉनीक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशचे शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण होण्या आधीच गुणवत्तेच्या जोरावर श्रवण नुकताच एका कंपनीत नोकरीला लागला आहे. नोकरी मिळाली हे सांगण्यासाठी तो आज आ. चव्हाण यांना आवर्जून भेटण्यासाठी आला. त्यावेळी श्रवणचा आ. सतीशराव चव्हाण यांनी सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्रवणची आई श्रीमती माया इनामदार, मामा श्री.राजेंद्र कादी हे दखील उपस्थित होते…
असा असावा लोकप्रिय लोकप्रतिनिधी, लोकप्रिय लिहण्याचा अधिकार यांच्याच नावामागे शोभून दिसते.. आ.चव्हाण यांच्या कार्याला लाल सलाम.. आणि पत्रकाराच्या मुलाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली,नीभावली त्याबद्दल मनापासून आभार व धन्यवाद..
(पंढरीनाथ बोकारे -पत्रकार)
M. 9823260073