जनतेच्या आशीर्वादानेच माणूस मोठा होतो- खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

कंधार ; प्रतिनिधी

कोन्ही कोणाला कोन्ही मोठं करत नाही जनता मोठं करते तेरवी आणी बारस करण्याचा आधिकार जनतेला आहे,लोकप्रतिनीधीला नाही कधी तसेच एका हाताने टाळी वाजत नाही कोणी पुण्यतिथी करतो म्हणल्याने आणि त्याची जागा दाखवतो म्हणाल्याने काहीही होत नाही. कोणाला कोणाची जागा दाखवायची हे जनतेच्या हातात आहे. जनतेच्या आशीर्वादाने माणूस मोठा होतो, कुणाच्या उपकाराने नाही, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे केले .

येथील संपर्क कार्यालयात दिः ६ रोजी सकाळी ९ वाजता निवडक पत्रकारासोबत खा. चिखलीकरांनी बातचीत केली. ते म्हणाले की, या मतदारसंघात माझ्या नांदेड लोकसभेचा काही भाग आहे. लातूरचे खासदार आहेत. मुखेडचे आ. तुषार राठोड आहेत. या सर्वांना संबंधित अधिकाऱ्यांनी बोलविण्याचे
भान ठेवायला पाहिजे होते पण त्यांनी त्याचे भान ठेवले नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांना जाब विचारला असता आमदारांचे नाव न घेता श्यामसुंदर शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाण्याची गरज नव्हती. आमदाराना हे शोभण्यासारख्ये कृत्य नाही. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या पण कोण्या आमदाराने ठाण्यात जाऊन बसून गुन्हा दाखल केला नाही, हे अशोभनीय कृत्य आहे.

लोकशाहीमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर लोकप्रतिनिधी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करीत

असतील तर लोकशाहीचा गळा घोटल्यासारखे झाले आहे. यापुढे मानधन उचलणारे सरपंच सुद्धा ३५३ सारखे गुन्हे दाखल करतील.

आता पर्यंतच्या काळातील महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी असे सांगून या घटनेचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो असे खा. चिखलीकर म्हणाले. यावेळी बाबुराव केंद्रे उमरगेकर, उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शेख आसीफ, प्राचार्य किशन डफडे, मधुकर डांगे, माजी पोलीस पाटील मोहम्मद कामोद्दीन, नगरसेविका अनिता कदम, निलेश गौर, चेतनभाऊ केंद्रे ,राजहंस शहापुरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *