संयुक्त ग्रुपची पाच तालुक्यातील कार्यकारणी जाहीर
कंधार ; ता.प्र.
संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्याचे नवीन कार्यकारणीची निवड नांदेड जिल्ह्यातील ५ तालुक्यात आज दिनांक 09 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात आली.संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांच्या वतीने नियुक्त्या देण्यात आल्या.नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तक्रार निवारण अभियान राबवण्यात येणार आहे.गाव तिथे संयुक्त तक्रार निवारण अभियान राबविणार असल्याची माहीती यावेळी आली.संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी दिली.
प्रामुख्याने निवडीमध्ये कंधार तालुकाध्यक्ष विजेंद्र कांबळे, कंधार युवा तालुका उपाध्यक्ष संदीप नवघरे, तालुका संपर्क प्रमुख नितीन गादेकर ,संयुक्त विद्यार्थी ग्रुपचे संपर्क प्रमुख करण पवळे, बिलोली तालुक्याचे तालुका अध्यक्ष विजय सूर्यवंशी ,देगलूर तालुक्याचे संपर्कप्रमुख निखिल जाधव, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहार तालुक्यामधील ज्योतीराम कदम यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली व मुखेड तालुक्याचे ग्रामीण तालुका अध्यक्ष संदीप तेंलगावे , प्रसिद्धीप्रमुख म्हणून दीपक कांबळे यांची निवड करण्यात आली.
पूर्ण महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अशा नियुक्त्या करण्यात येणार आहेत. संयुक्त ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त तक्रार निवारण हे अभियान गावोगावी राबवण्यात यणार आहे या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना जे शासकीय कामकाज बाबत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तक्रार निवारण अभियान राबवण्यात येणार आहे.
गाव तिथे संयुक्त तक्रार निवारण अभियान राबविणार असल्याची माहीती यावेळी .संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी दिली.