नविन नांदेड : जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे य यांच्या उपस्थितीत दत्त मंदिर तुप्पा येथे ११ जुलै रोजी होत असलेल्या साखरपुड्यात देशमुख – पावडे परिवारातील सदस्याचा संमतीने अनाठायी खर्चला फाटा देत अवघ्या काही वेळात १० वाजुन ३१ मिनिटांनी विवाह सोहळा संपन्न झाला.
तुप्पा येथील दत्तमंदिर संस्थान येथे पावडेवाडी येथील चि.अमृत ऊर्फ पप्पू अशोकराव पावडे व तुप्पा येथील चि.सौ.कां.शितल त्रिंबकराव देशमुख यांच्यी कन्या यांच्या समवेत ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार मोहनराव हंबर्डे व आंनदबन महाराज कौलंबीकर, गिरीष पत्की, श्रीकांत ठाकुर, सुनिल हंबर्डे,राजु हंबर्डे,नवनाथ फावडे, महैद्रसिंग फौजी ,रामराव हंबर्डे, शामराव हंबर्डे यांच्या सह देशमुख व पावडे परिवारातील सदस्यांचा उपस्थितीत कोरोना रोगाचे शासनाने दिलेले नियम पाळत केवळ ४० लोकांच्या उपस्थितीत हा साखर पुडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दोन्ही परिवारातील सदस्य यांना सांगूण साखरपुड्यात लग्न करण्याचे सुचविले व दोन्ही परिवारातील सदस्य यांनी समंती दिल्यानंतर काही वेळाताच शुभविवाह तयारी झाली व मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.
देशमुख व पावडे परिवाराने अनाठायी खर्चाला फाटा देत हा आदर्श विवाह सोहळा घडवून आणला असून समाजात आदर्श घेण्यासारखा हा विवाह सोहळा झाल्याचे उपस्थित दोन्ही परिवारातील सदस्य यांनी सांगितले.