संघर्ष थांबणार नाही. यापुढेही तो सुरूच राहील!

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. भारतीय जनता पक्षातील मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (ता. १० जुलै) बीडमधील १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. विस्ताराच्या दिवशीही मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सविता रामदास बडे, तर प्रकाश खेडेकर यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांसह १४ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवून दिले आहेत. प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने मुंडे भगिनींवर अन्याय केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंडे यांच्यावर अन्याय केला जात असून यापुढे तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही समर्थकांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ७ जुलै रोजी झाला. त्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. सुरुवातीला आघाडीवर असलेले मुंडे यांचे नाव विस्ताराच्या दिवशी मागे पडले आणि प्रीतम यांची केंद्रीय मंत्री होण्याची संधी हुकली. मुंडे यांच्याऐवजी खासदार भागवत कराड यांना संधी देण्यात आली. केंद्रीय मंत्रीमंडळातून पत्ता कट झाल्याने पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे ह्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, काल पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज झाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र समर्थकांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

विस्ताराच्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. काहींनी तर थेट पंकजा मुंडे यांना ‘ताई आता निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत कायम राहू’ असे साकडे घातले होते. बीड जिल्ह्यात मुंडे समर्थक नाराजांनी शुक्रवारपासून भाजपतील आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज बीडमध्ये १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. हे सर्व फादर बॉडी आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेला पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आम्ही कुठेही नाराज नाही. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. पक्षाचा निर्णय पटलेला आहे अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. त्याचसोबत टीम नरेंद्र, टीम देवेंद्र हे भाजपाला मान्य नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजपा मला संपवत आहे असं मला वाटत नाही. मी छोटीशी कार्यकर्ता आहे त्यासाठी पंतप्रधानापर्यंत मला संपवण्याचा प्रयत्न कसा होईल? असा प्रश्न त्यांनी केला.

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष त्यानंतर मी असं धोरण आहे. ‘मी’पणा भाजपात नाही. आम्ही, आपण ही संस्कृती भाजपात आहे. भाजपाच्या संस्कृतीला मानणारी मी पक्षाची सामान्य कार्यकर्ता आहे. वेळोवेळी मी हे सांगितले आहे. पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला दिली आहे. राज्यात मुंडे-महाजन नेतृत्व करत होते तेव्हा तळागळातील लोकांना एकत्र आणून मुंडे साहेबांनी लोकांना संधी दिली आहे असं पंकजा मुंडेंनी सांगितले.

गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र करण्याचं काम केले आहे. मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मान्य नाही. मी राज्याची महिला नेता, चांगली वक्ता आहे. नेता हा नेताच असतो. तो कोणत्याही जातीचा समाजाचा असत नाही. वंजारी समाजातील व्यक्ती मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठिशी आहे आणि राहणार आहे. पक्षाने भागवत कराड यांना संधी दिली आहे. त्यांचा पक्ष संघटनेसाठी फायदा होईल. भविष्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी त्यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात हे दिसून येईल. पक्ष वाढवण्यासाठी नेते निर्णय घेत असतात. पक्ष मजबूत व्हावा यासाठी निर्णय घेतले जातात. पक्षाच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नव्या लोकांना संधी दिली जात आहे असं पंकजा म्हणाल्या.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन लागोपाठ तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपने धक्काच दिला नाही, तर औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केल्याची मुंडे समर्थकांत चर्चा आहे. एकापाठोपाठच्या घटनांमुळे पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींची नाराजी या राजकीय मौनातून उघड उघड दिसत आहे.गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नाराजी दाखविली होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूूमीवर मुंडेंनी ‘आम्ही मुंबईतच आहोत,’ असे एकच ट्विट केले होते. त्यानंतर मात्र त्या माध्यमांशी काहीही बोलल्या नाहीत. त्यांच्या समर्थकांनी मात्र समाज माध्यमाद्वारे संताप व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपात नाराजीचे पडसाद उमटले आहेत. बीडमधील १४ भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला आहे असं सांगत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे.

भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मुंडे यांना मंत्री नाही केले तर काय झाले. ताई साहेब, आमच्या मनात आताही मंत्री आहेत. पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज नाही राहिली. आता तरी ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी गुरुवारी पसरविला होता.

४० विधानसभा मतदारसंघांत माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे भगिनींचा प्रभाव आहे. पक्षातील वरिष्ठांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना साथ द्यायला हवी; परंतु साथ न देता त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न चालू आहे. ताईंनी वेगळी भूमिका घ्यावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत, असे भाजपा कार्यकर्ता सचिन गीत्ते यांनी सांगितले. जनतेतून विक्रमी मताने निवडून येणाऱ्या नेत्यास डावलल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली.

हाच वसा पुढे चालवत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा व खा. प्रीतम मुंडे यांनी पक्षाला सत्तेवर बसवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, आता काही स्वकीयांच्याच कारस्थानांमुळे मुंडे भगिनींना डावलण्याचा हा प्रकार आहे. यामुळे भाजपाचेच नुकसान होणार आहे, असे अश्विन मोगरकर यांनी सांगितले.

पक्षासाठी पायाला फोड येई पर्यंत आम्ही काम केले. भाजपला मला संपवायचे आहे, असे नाही. मी इतकी मोठी नाही की पंतप्रधान मला संविण्यासाठी असे करतील. मी नाराज नाही, असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. मात्र, यावेळी त्या गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. प्रीतम मुंडे वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणूक उभ्या राहिल्या तेव्हा त्या रेकॉर्डब्रेक निवडून येणारच होत्या. यंदाच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी स्वत:च्या मेरिटवर जिंकल्या माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षाकडे येणारी आहे. मी म्हणजे पक्ष नाही. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांच्यामुळे भाजपाला ताकद मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे. माझ्या आईला जी पेन्शन मिळते ती दुसऱ्या टर्मसाठी मिळत नाही. गोपीनाथ मुंडेसाहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. फार मोठी पुण्याई आहे. त्यांच्यामुळे आज मी इथं बसली आहे. यामागे २५-३० वर्षाचा संघर्ष आहे. मी आताही काम केले तरी २५-३० वर्ष संघर्ष करावा लागेल. नेता हा नेता असतो. जो वंचित आहे त्यांना न्याय देण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी शिकवलं आहे. अनेकदाच वंचितांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे पक्षाची ताकदच वाढली कमी झाली नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी वडिलांच्या आठवणीने गहिवरल्या.

यावेळी पंकजा म्हणाल्या की ”ज्योतिरादित्य शिंदे यांना फोन करून मंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. कपिल पाटील, भारती पवार यांनाही मी फोन केला. मी सगळ्यांशी बोलले आहे. मंत्रिपद मिळालेल्या नवीन मंत्र्यांना एक दिवस आधी दिल्लीत बोलवले होते. रात्री १२ वाजता भागवत कराड यांचा मला फोन मला आला होता. त्यांनी सांगितले की मला पक्ष कार्यालयातून फोन आला आहे. त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. त्यामुळे नाराज असण्याचा काहीच संबंध नाही, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रात कोणतेही पद देण्याची वेळ येते, तेव्हा मुंडेंचे नाव चर्चेत असते. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी माझेही नाव चर्चेत होते. अन्याय झाला असे समर्थक म्हणतात. त्यावर पंकजा म्हणाल्या, जनता एका नेतृत्वाला उभे करण्यासाठी कष्ट करत असते. त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की आपल्या नेत्याला काही मिळाले पाहिजे.

प्रीतम मुंडे यांचे नाव योग्य होते. त्यांनी चांगले काम केले आहे. महिला आणि बहुजन चेहरा होता. कदाचीत पक्षाने काही निर्णय घेतला असेल. भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याची एक पद्धत आहे. नवीन-नवीन लोकांना संधी देण्यामध्ये काय हरकत आहे. नाराज असल्याच्या चर्चा आता थांबल्या पाहिजे. पक्षाने मला अर्ज भरायला लावला होता. आणी नंतर दुसऱ्याला तिकिट दिले. त्यावेळी सुद्धा मी नाराज नव्हते. मी मोठी नेता नाही. राजकारणात आले ते एक व्रत म्हणून आले. मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मला राजकारणात यावे लागले. मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. मला फक्त वंजारी म्हणून बघणे चुकीचे आहे. वंजारी समाजातील कोणी माणूस मोठा होत असेल तर मी त्यांच्या मागे उभी राहणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

पक्ष वाढवण्यासाठी नवीन लोकांना संधी द्यावी लागते. नवीन-नवीन चेहरे आले. त्यामुळे पक्षाची ताकद वाढले असे नेतृत्वाला वाटत असेल. मला माहिती नाही टीम देवेंद्र आणि नेरेंद्र मध्ये कोण आहे. पण भाजपला कोणतीही टीम मान्य नाही. मला पक्ष निष्ठा माझ्या बापाने शिकवली आहे. संजय राऊत यांना माझ्याशी बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांनी लिहिले ते त्यांचे मत आहे. प्रीतम मुंडे यांना लोकसभेचे तिकिट मिळणार आहे की नाही, याचीही चर्चा होती. मी आणि पक्ष वेगळे नाही. पक्षामध्ये नवीन लोक आले त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचे सांगितले. तर प्रीतम मुंडे यांचे नाव मंत्रिपदासाठी योग्य होते, असे त्या म्हणाल्या.

प्रीतम मुंडे यांनी रेकॉर्डब्रेक मते मिळवून दोन टर्म खासदारकी जिंकूनही त्यांना का डावलले गेले, असे विचारताच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंसोबतची एक आठवण सांगितली. ही आठवण सांगताना त्यांचे डोळे पाणावले. गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच भाजपची आमदार होते. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला होता, हे सांगताना त्यांचा गळा दाटून आला होता. प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. मात्र, आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्यांनी त्यांच्या मेरिटवर जिंकली. प्रीतम मुंडे यांना लोकसभेला तिकिट मिळणार की नाही, अशीही चर्चा रंगली होती. असेही त्यांनी सांगितले.

मत असते ते वैयक्तीक असते. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते आणि ते योग्य होते. त्या विक्रमी मताने निवडून आल्या आहेत. त्यांनी चांगले काम केले, खूप हुशार आहेत. बैठकींना त्या उपस्थित असतात. कोणताही कार्यक्रम त्यांनी डावललेला नाही. तरुण आहेत, महिला आणि बहुजन चेहरा होत्या. म्हणून त्यांचे नाव न येण्यासारखे काही नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. केवळ प्रीतम ताईंचेच नाव आले नाही असे नाही. पक्षाने मला फॉर्म भरायला लावला तेव्हाही मी पात्र आहे का असे विचारले होते. नंतर त्यांनी रमेश आप्पा कराड यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले. तो निर्णयही मला पटला होता. पक्ष आमच्या संस्कारात आहे. त्यामुळे निर्णय पटणे आणि न पटणे हा प्रश्न नसतो, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, मंत्रिपद मिळालेल्या नवीन मंत्र्यांना एक दिवस आधी दिल्लीत बोलवले होते. रात्री १२ वाजता भागवत कराड यांचा मला फोन मला आला होता. त्यांनी सांगितले की मला पक्ष कार्यालयातून फोन आला आहे. त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे. वंजारी समाजातील कोणीही नेता मोठा होत असले तर मला आनंदच आहे. मी त्यांच्या पाठीशी उभी राहील असेही पंकजा यांनी यावेळी सांगितले. ज्योतिरादित्य शिंदे यांना फोन करून मंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. कपिल पाटील, भारती पवार यांनाही मी फोन केला. मी सगळ्यांशी बोलले आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. त्यामुळे नाराज असण्याचा काहीच संबंध नाही, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात कोणतेही पद देण्याची वेळ येते, तेव्हा मुंडेंचे नाव चर्चेत असते. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी माझेही नाव चर्चेत होते. अन्याय झाला असे समर्थक म्हणतात. त्यावर पंकजा म्हणाल्या, जनता एका नेतृत्वाला उभे करण्यासाठी कष्ट करत असते. त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की आपल्या नेत्याला काही मिळाले पाहिजे.

भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजपा मला संपवत आहे असं मला वाटत नाही. मी छोटीशी कार्यकर्ता आहे त्यासाठी पंतप्रधानापासून कामाला लागतील असं वाटत नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र त्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम आहे.

संपादकीय

गंगाधर ढवळे,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *