अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पीक विमा कंपनीस तात्काळ माहिती कळवावी – जिल्हांधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टीअ झाली आहे. त्याेमुळे नदी नाल्यांॉना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्यानची शक्यनता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्याश नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्येक कळवावी, असे आवाहन जिल्हा धिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यारस, भुस्खालन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसानग्रस्त झाल्याखमुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तगरावर पंचनामे करुन निश्चित करण्यानत येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्यान पावसामुळे पाण्यािची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन, शेत दिर्घकाळ जलमय राहिल्याणमुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्याहस विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्यात पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यादसाठी पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्लेा स्टोनअर वरुन Crop Insurance हे अॅप डाउनलोड करुन त्या.मध्येु आपल्याम नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा [email protected] या पत्याावर ई-मेलवर नुकसानीची पुर्वसुचना दयावी किंवा कृषी विभाग व महसूल विभागास याबाबत माहिती कळवावी, असेही आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *