लोककलेचे – लोककलावंताचे वटवृक्ष : रामकृष्ण ढेरे

लोककलेचे – लोककलावंताचे वटवृक्ष : रामकृष्ण ढेरे
——————————————————————-

महाराष्ट्राची लोककला म्हणजे ‘लावणी- गोंधळ ‘ जगात गाजवणारे, आंबेडकरी साहित्य आणि चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, दलित पॅन्थरचे एकनिष्ठ कार्यकर्ते, नामांतराच्या चळवळीत सक्रिय सहभागी, परभणी ते औरंगाबाद लाॅग मार्च काढणारे, लोककलेचे गाढे अभ्यासक, ( पॅरिस) फ्रान्स,(अँमस्टरडॅम) हॉलांड 1986, अमेरिका आदी युरोपियन देशात भारतीय लोककला व लोककलावंतांना घेऊन जाणारे आणि लोककलेच्या सादरीकरणातून पाश्चात्य देशातील लोकांची मने जिंकणारे लोककलावंत प्रमुख सूत्रधार असणारे आदरणीय रामकृष्ण ढेरे गुरुजी!
रामकृष्ण दगडोबा ढेरे यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील इरळद येथे 14 मार्च 1953 रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले त्यांनी बीए ओनर्स एम ए. राष्ट्रभाषा, हिंदी पंडित पुणे, प्रसारक राष्ट्रभाषा हिंदी इत्यादी पदव्या घेऊन परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथे  1971 ते 1977 या कालखंडात दरम्यान शिक्षक म्हणून सेवा केली होती. तसेच पुढे ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ परभणी येथे 1980 पासून लिपिक या पदावर  सेवा करत असतानाच 13 ऑगस्ट 1999 रोजी परभणी येथील बसस्थानकासमोर लहान मुलांना स्कूटरच्या अपघातातून वाचतांना काळाने त्यांच्यावरच घाला घातला आणि अपघाती निर्वाण झाले. गेली दोन दशके ते आपल्यात नाहीत तरीही ते लोककलेच्या साहित्याच्या माध्यमातून जिवंत आहेत त्यांचे विचार त्यांचे कार्य समाजाला- लोककलावंतांना प्रेरणा देणारे , ऊर्जा देणारे,, मार्गदर्शन करणारे असेच महान आहे. त्यांच्या कार्याचा आपण थोडक्यात परिचय पाहणार आहोत.
आदरणीय रामकृष्ण ढेरे यांनी लोककलेच्या माध्यमातून लोककलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. तसेच समाजातील तळागाळातील लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. गोंधळ राजारामबापू कदम या कार्यक्रमाचे ते मुख्य कलावंत व सूत्रधार राहिलेले आहेत. त्यांनी लोककलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. लोकांच्या कल्याणासाठी लोक – कलेसाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले आहे. साहित्य असो की लोककलावंतांचा कार्यक्रम असो या कार्यक्रमांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. ते राष्ट्रभाषा हिंदी पंडित, पुणे प्रचारक राष्ट्रभाषा हिंदी, नाटककार, कवी, कथाकार कलावंत आकाशवाणी- दूरदर्शन इत्यादी ठिकाणी मुख्य सूत्रसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मराठी चित्रपट सृष्टी सहकलाकार म्हणून ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. लावणी या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दक्षिण मध्ये संस्कृती क्षेत्र नागपूर व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तर्फे संपूर्ण भारतामध्ये विविध लोककला प्राधिकरण भक्ती संगीत महोत्सव पंढरपूर 1989 कलावंत व संयोजक राजाराम बापु कदम आणि पार्टी महत्त्वाचे सूत्रधार होते व महत्त्वाचे कलाकार होते. अखिल भारतीय लोककला महोत्सव 1984 तसेच ट्रेड फेअर नवी दिल्ली या कार्यक्रमाचे ते प्रमुख कलावंत व सूत्रधार राहिले आहेत. कलावंत म्हणून संगीत, नाटक, अकादमी पारितोषिक वितरण समारंभ मद्रास 1984 कलावंत व सूत्रधार गोंधळ पार्टी प्रमुख उपस्थिती उपराष्ट्रपती आर के वेंकटरमण यांच्याकडून त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. भारत महोत्सव पॅरिस फ्रान्स हॉलंड आणि अमेरिका 1986 मध्ये भरलेल्या कार्यक्रमात उपस्थित महाराष्ट्राचे माजी राज्यपाल मा. आय एच लतिफ व माननीय तेथील राजदूत यांच्याकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांना सन्मानित केले गेले आहे. तसेच उत्सव 1989 या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार कलावंत गोंधळ पार्टी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व सोनिया गांधी आधीच्या हस्ते त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री कृष्णा साही यांच्या हस्ते सांस्कृतिक उत्सव पाटणा शेकापुर लावणी संच प्रमुख उपस्थितीत त्यांचा मान व मानसन्मान व सत्कार करण्यात आला. आकाशवाणी – दूरदर्शन कार्यक्रम मुंबई, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी, सांगली, परभणी आधी केंद्रावर त्यांनी लोककलावंत लोककलेचे प्रमुख सूत्रधार म्हणून कार्यक्रम गाजवले आहेत. उत्सव शिमला येथे त्यांनी लावणी संच चे प्रमुख आणि म्हणून प्रमुख पाहुणे राजीव गांधी सोनिया गांधी राज्यपाल आर के एस गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. अंदमान निकोबार येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी लावणी त्यांचे प्रमुख म्हणून राज्यपाल एस. पुरुषोत्तम यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचे कौतुक आणि गौरव करण्यात आला. केरळ येथील महोत्सव या कार्यक्रमात त्यांनी लोककला लावणी संच प्रमुख उपस्थिती म्हणून काम पाहिले आहे. भोपाळ मध्यप्रदेश मध्ये त्यांनी आपल्या लावणीचा आणि लोककलेचा ठसा उमटवलेला आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या महोत्सवात त्यांनी लोककला आणि लावणी- गोंधळ या कार्यक्रमाने भारतीयांची नव्हे तर संपूर्ण जगातील कलाप्रेमीची मन जिंकून घेतले आहे. महाराष्ट्रातील लोककला – लावणी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. भारतीय संस्कृती दर्शन नागपुर महाराष्ट्र त्यांनी लावणी यांची प्रमुख उपस्थिती विशेष शिष्टमंडळ आले होते. त्या शिष्टमंडळाच्या हस्ते ढेरे गुरूजींचा यांचा सन्मान करण्यात आला होता. महाराष्ट्रातील विखुरलेल्या लोककलावंतांना संघटित करणे, लोक कलेचे संवर्धन करणे आणि उपस्थित कलावंतांच्या समस्या, लोककलावंतांच्या वेगवेगळ्या मागण्या प्रशासनास सांगणे, त्यांच्या प्रश्नाला शासन दरबारी मांडणे इत्यादी उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहेत. 

       आदरणीय रामकृष्ण ढेरे हे लोककलेचे- लोककलावंतांचे एक वटवृक्ष होते. एक आधारवड होते. त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून लोककलावंतांना संघटित करून त्यांच्या लोककलेला प्रसिद्धी देण्याचे काम व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या लोककलेच्या कार्यामुळे महाराष्ट्राची लोककला – लावणी, गोंधळ हे पाश्चात्त्य देशांना माहिती झाली आहे. हे उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण भूमिका भारतीयांच्या तसेच मराठी माणसांच्या मनात कायमची राहणार आहेत. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार त्यांचे कार्य लोककलावंतांना प्रेरणादायी आणि महत्त्वाची आहेत. लोककलावंतांचे , आधुनिक भारतातील लोककलावंतांची, पुरोगामी महाराष्ट्रातील लोककलावंतांची अस्मिता आहेत. रामकृष्ण ढेरे यांनी पदव्युत्तर व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी लोकसाहित्याचे मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थी लोकसाहित्य लोककला म्हणजे संशोधन करतात त्या विद्यार्थ्यांना त्यांनी विनामूल्य मार्गदर्शन केले आहे. ती करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे रामकृष्ण ढेरे गुरूजींचा मोठा वाटा आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विनंतीवरून वाय्यवासाठी विशेष उपस्थित होते. लोक कलेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. यामध्ये मनीषा दीक्षित पुणे, तसेच प्रदीप घोनशीकर  यांना लोककलेचे मार्गदर्शन केले आहे.( मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) मध्ये त्यांनी केले आहे ही उल्लेखनीय बाब आहे.
                 मागास भागातील लोकांच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचा आशाय आढावा, घेऊन लेखन करणारे कथाकार, नाटककार, गीतकार व लोककलावंत म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. ‘पुंजाजी कोरे पाटील’ हा त्यांचा आत्मचरित्रपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यावर आधारित’ झडणारं झाड’ हे नाटक महाराष्ट्र राज्य शासकीय परिवहन महामंडळाच्या स्पर्धेतून सादरीकरण केले आहे. तसेच दारूबंदी निर्मूलन कार्यक्रमावर त्यांनी’ मनाचा ब्रेक ‘ही एकांकिका सादर केली आहे. ग्रामीण जीवनाचा वेध घेणारे तीन आणखी चौकशी कामगार चळवळीशी निगडित असताना आता ‘सिंहासन खाली करा’ व्यावसायिक रंगभूमीवर सादर करते शाहीर अमर शेख कलापथक मुंबई  याही कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘प्लॉट फ्रॉम’ एकांकिका राज्यपातळीवर पुरस्कार प्राप्त करून कामगार कल्याण केंद्र परभणी येथे त्यांनी या नाटकाचा प्रयोग राबविला आहे. तोही यशस्वी केला आहे. अनुसूचित जातीमधील पोट जातीवर आधारित एकांकिका ‘फारकती’ त्यांची गाजलेली एकांकिका आहे. जीवनाचा वेध घेणारी एकांकिका’ पोटाची खळगी’ तळागळातील माणसाच्या जगण्यातील वास्तव दाखवणारी एकांकिकाही तसेच स्त्री जीवनाचा ठाव घेणारी त्यांचे दुःख मांडणारी त्यांच्या भावनांचा अविष्कार करणारी ‘शहाणे इथे चुकले ही’ एकांकिका स्त्री जीवनावर आधारित आहे, तसेच बालकांसाठी त्यांनी ‘शाळा सुटली पाटी फुटली ‘ही एकांकिका प्रसिद्ध आहे. त्यांनी सामाजिक समस्यावर आधारित ‘लोभ्या घर जाळतो’ हे नाटक माणसाच्या वेगळ्या प्रवृत्तीवर लिहिले आहे. तसेच’ दीड दिवसात कोल्हा उसात ‘हे विद्यार्थी जीवनावर आधारित त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे, जीवनाचा वेध घेणारी हुंड्या विरोधी एकांकिका’ गाजराची पुंगी’ प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मातील प्रचलित सामाजिक व्यवस्थेसी निगडीत ‘आम्ही चाललो कुठे?’ ही एकांकिका अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात लातूर येथे सादरीकरण केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या साहित्याच्या क्षेत्रातून उल्लेखनीय असे लिखाण केले आहे.ढेरे गुरुजी एक उत्कृष्ट लेखक – पत्रकार होते. त्यांनी दैनिक समता, दर्पण, दैनिक लोकमत या वर्तमान विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रातून लेखन केले आहे. साप्ताहिक समाजजागृतीचे ते संस्थापक होते. तसेच साप्ताहिक रणांगण मुंबई या साप्ताहिकाचे ते प्रतिनिधी होते. त्यांनी वेगवेगळ्या साहित्यात वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आपले प्रबोधनपर विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. सामान्यातल्या सामान्य माणूस हा शिक्षित झाला पाहिजे. त्यांनी आपली उपजीविका स्वतः केली पाहिजे. त्यांनी लोककला  जपली पाहिजेत. हा त्यांचा हेतू होता. लोककलावंतांना न्याय मिळाला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि महाराष्ट्राची लोक कला लोकपरंपरा अटकेपार नेऊन ठेवली आहे. हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन केले आहे. लोककला महोत्सव महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीने त्यांनी परभणी येथे लोककलेचे आयोजन केले होते. तसेच तमाशा कलावंत मेळावा सातत्याने 1980, 1982, 1986 आणि 1989 मध्ये त्यांनी प्रमुख उपस्थिती दादासाहेब रुपवती  विलासराव देशमुख, प्रतापराव भोसले आधीच्या उपस्थित हे मिळावे अतिशय उत्कृष्टपणे घेतले. तसेच मराठवाड्यातील लोक कलावंतासाठी आपना उत्सवाच्या धरतीवर लोकरंग उत्सव सुरू केला होता. यामधून मराठवाड्यातील लोक कलावंतांना आपली कला सादर करून लोककलेची किमिया प्रदर्शित करून दाखवली आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री,राज्यपाल सिनेअभिनेते, सांस्कृतिक मंत्री यांना बोलून वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत त्यापैकी लोककलेची रात्र हा त्यांचा लोककलेचा स्नेहमेळावा निसर्गाच्या सानिध्यात आयोजित केला होता .यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख सिनेअभिनेते श्रीराम गोजमगुंडे तसेच प्रमुख पाहुणे अशोकरावजी परांजपे हे उपस्थित होते .तसे त्यांनी बालकांसाठी बाल नाट्य शिबीर 1982 ललित कला भवन परभणी येथे आयोजित केली होते तत्कालीन आमदार सुरेशरावजी वरपूडकर सत्कार समिती चित्रपट संचालक म्हणून प्रमुख पाहुणे अशोक परांजपे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच महावीर जोंधळे सत्कार समिती राजारामबापू कदम शताब्दी सत्कार समिति, मराठवाडा गौरव परिषद औरंगाबाद लोककलांना लोककलावंतांचा मेळावा महाराष्ट्र राज्य परभणी आधी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लोककला व कलावंतांना न्याय मिळवून दिला. त्यांनी गोंधळ महर्षी राजारामबापू कदम आणि पार्टी यांच्या कार्यक्रमात कलावंत व सूत्रधार म्हणून 1980पासून ते 1999 पर्यंत प्रमुख पाहुणे म्हणून नि:स्वार्थीपणे काम करत राहिले.त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी दखल घेऊन त्यांना शासनाचे वेगवेगळे सन्मान व पुरस्कार प्रदान केले आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंडळ यांच्या वतीने गुणवंत कामगार म्हणून पुरस्कार मिळाला. तीन वेळा विभागाच्यावतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेतर्फे माजी न्यायमूर्ती आर आर भोळे यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत राजा ढाले व डॉक्टर कुमारी एलिना झेल अमेरिका( मुंबई 1977) रोजीआदरणीय रामकृष्ण ढेरे यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला होता. तसेच मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू भगतसिंग राजूरकर यांच्या हस्ते पूर्णा येथे रामकृष्ण ढेरे यांचा 1986मध्ये सत्कार आणि गौरव करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते औरंगाबाद येथे 1990मध्ये लोककलावंतांचे आधारवड असणारे रामकृष्ण ढेरे गुरूजींचा  सत्कार करण्यात आला होता. जेष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर असतील तसेच सांस्कृतिक सचिव महापात्रा यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन रामकृष्ण ढेरे यांना सन्मानित केले आहे. 1995 म्हणजे दीप महोत्सव अंदमान निकोबार चे राज्यपाल एस पुरुषोत्तम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ई. के. नयनार मुख्यमंत्री केरळ  यांच्या हस्ते भव्य सत्कार  करण्यात आला होता.

              रामकृष्ण ढेरे हे  वेगवेगळ्या समितीवर अध्यक्ष सचिव आणि सदस्य राहिले आहेत. तमाशा लोककला मंडळ  मराठवाडा प्रदेश 1977 ते 90  या कालखंडात अध्यक्ष म्हणून राहिले आहेत. तसेच त्याला विकास नाट्य मंडळ परभणी 1974 ते 1990 अध्यक्ष राहिलेले आहेत. ते ज्ञानज्योत शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे संस्थापक  राहिलेले आहेत.  तसेच  महाराष्ट्र लोक कला संवर्धन मंडळ परभणी अध्यक्ष, तसेच मागील भाई जोंधळे मित्र मंडळ परभणी चे अध्यक्ष,  इंडो जपान बुद्धिष्ट कल्चरल सोसायटी शाखा परभणी चे अध्यक्ष राहिलेले आहेत, मराठवाडा संघटक पारंपरिक लोककला व त्यांची निवड झालेली होती. महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद 1977 ते 1987 या दहा वर्षासाठी कार्यकारिणी सदस्य म्हणून  काम केले आहे. त्यांनी  स्वर मंडळ कोल्हापूर 1977 सचिव राहिलेले तर  मराठी लोककला अकॅडमी मुंबई येथे विश्वस्त राहिलेले आहेत, तसेच महात्मा फुले प्रतिष्ठान पुणे 1972 ते 1978 मधे सदस्य व  तमाशा कलावंत विकास मंडळ मुंबई 1980 ते 1987 प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहेत. महात्मा फुले बौद्ध साहित्य संमेलन सदस्य राहिलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परभणी ते सदस्य राहिलेले आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा अध्यक्ष होते. मराठा मराठवाडा साहित्य परिषद परभणी 1980- 89 या कालखंडाचे उपाध्यक्ष पुरोगामी मित्र मंडळ मुखेड जिल्हा नांदेड येथे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेले. महाराष्ट्र रिपब्लिकन student’s फेडरेशन शाखा परभणी 1971 ते 1970 दरम्यान त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलेले.  मराठी लोककला संशोधन केंद्र मुंबई येथे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिलेले, भटक्या विमुक्त जाती- जमाती  संघटना जिल्हा परभणी ते सल्लागार राहिलेले महाराष्ट्र पिंजारी समाज परभणी, म्हणून संघटक म्हणून त्यांनी काम पाहिले, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना परभणी प्रसिद्ध सचिव होते ते सहभाग व निवड समिती अनेक समाज प्रबोधन करणार्‍या संघटना  त्यांनी काम पाहिले, दलित मुक्ती संघर्ष समिती औरंगाबाद 1978 मध्ये त्यांनी काम पाहिलेले, इंडियन नॅशनल थिएटर च्या मार्गदर्शनाखाली मुखेड येथे पारंपरिक लोककलेतून समाज प्रबोधनासाठी एका वर्षाची शिबिर घेण्यात आले होते तिथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभाग व त्यांचा 1984 अनेक साहित्य संमेलनामध्ये कवी, कथाकथन व परिसंवादात यांचा संवाद घेतला होता. विविध नियतकालिकातून संशोधनपर लेख, मराठवाड्याची रूपरेषा दैनिक लोकमत यांचा लेख, मराठवाड्यातील लोककला लोकमत  संगीत बारी रुपेरी पडदा मुलाखत मधु कादंबरीकर, दैनिक लोकमतमध्ये तमाशा लोककलावंतांची शिबिर दैनिक लोकमत, लावणीसम्राज्ञी पद्मभूषण  सत्यभामाबाई यांची मुलाखत,  अपेक्षित कलावंत नानू गंगाखेडकर दैनिक तरुण भारत, मराठवाड्यात चित्रपट सोसायटी व्हाव्यात हा त्यांचा अग्रलेख दैनिक अजिंठा मध्ये प्रसिद्ध होता. संगीत बर्याच वेता दैनिक अजिंठा तसेच त्यांनी सामाजिक दृष्ट्या सहकार्य व सांस्कृतिक कार्यक्रमात उल्लेखनीय काम केले डॉक्टर जब्बार पटेल यांच्या महाराष्ट्राचे 25 वर्ष या चित्रपटासाठी सहकार्य केले आहे. राष्ट्रीय सांस्कृतिक धोरण शिबिरात पुणे येथे ठरण्यासाठी लोककलेचे अभ्यासक म्हणून त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. एक गाव एक पाणवठा बाबा आढाव यांच्या चळवळीत सहकार सक्रिय सहभाग घेतला होता. तसे त्यांच्या पुस्तकातील नोंद आहे. राष्ट्रभाषा हिंदी चे प्रचारक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लोक कलेचे प्रदर्शन त्यांनी सर्वप्रथम करून लोककलेचा सन्मान वाढवले. व्याख्याते म्हणून विविध विद्यापीठात, विविध शहरात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यता या परिसंवादांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला भिवंडी येथे त्यांचा सहभाग 1989 मध्ये, चौदावे बौद्ध साहित्य संमेलन मुंबई येथे पटकथा लेखक म्हणून परिसंवादात यांचा सहभाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती कळमनुरी येथे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहिले आहेत. अशा वेगवेगळ्या साहित्य संमेलनातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. त्यांचे कार्य उल्लेखनीय आणि मार्गदर्शन असे आहे. त्यांनी वेगवेगळ्या राज्यात अंधश्रद्धा, दारूबंदी  पुरोगामी विचार, लोककला आधी विषयावर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश , राजस्थान येथे व्याख्याने दिली आणि व्याख्याते म्हणून ते उपस्थित राहिले आहेत. तसेच त्यांचे दलित चळवळीतील योगदान- आंबेडकरी चळवळीतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन चे अध्यक्ष असताना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन करणे, मोर्चे काढणे  घेराव घालून इत्यादी कार्यक्रमात सक्रिय सहभागी होते.
        महाराष्ट्र शासनातर्फे स्पर्धात्मक परीक्षेसाठी मागासवर्गीय याकरिता मार्गदर्शक म्हणून एक ट्रेनिंग सेंटर उघडणे यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन करून एक ट्रेनिंग सेंटर डेक्कन कॉलेज पुणे येथे उघडण्यात आले. ही रामकृष्ण ढेरे सरांची दखलपात्र बाब आहे. तसेच बेरोजगार मागासवर्गीयांसाठी एक स्वतंत्र नोंदणी कार्यालय उघडणे यासाठी त्यांनी वेळोवेळी मोर्चे करून स्वतंत्र नोंदणी कार्यालय एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नंबर तीन यशोधन बिल्डींग मार्गे रोड मुंबई येथे उघडण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस आणि जनता या मैत्री निर्माण करण्यासाठी शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याकरता भारतीय सहाय्यक सेवादल ही संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारतर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीसाठी त्यात महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देण्यात येईल यासाठी त्यांनी वेळोवेळी निवेदन करणे मोर्चे काढणे  आंदोलन करणे आदी प्रमुख नेतृत्व केले होते. परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी व चळवळीतील योगदान देण्याकरता त्यांना त्या प्रकारचे मार्गदर्शन करणे विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. दलित पॅंथर शाखा परभणी जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी 1977 मध्ये कार्य केले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर सक्रिय सहभाग घेतला. तसेच परभणीहून औरंगाबादला लॉंग मार्च काढण्यात आला होता 26 नोव्हेंबर 1971 मध्ये महत्त्वपूर्ण त्यांचा सहभाग होता. नामांतर चळवळीतील झालेल्या नुकसानीची शासनास आकडेवारीसह माहिती पाठवण्यासाठी दलित साहित्य समिती औरंगाबाद परभणी विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम केले.  ब्राह्मणगाव येथे दलित स्त्रीवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न या गावाची पाहणी करून शासनाला माहिती पाठवली. मंठा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तेव्हा तिथे जाऊन प्रक्षुब्ध जमावाला शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. सोबत दलित पॅंथरचे सरचिटणीस सध्याचे केंद्रीय सामाजिक मंत्री मा. रामदास आठवले हेही उपस्थित होते.आंतरवेली कत्तलेची  प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पत्रकारांना घेऊन गेले व संपूर्ण माहिती त्यांनी दिली आणि रुखम्याला शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी मोठा प्रमाणात प्रयत्न केले होते. या कार्य बद्दल परभणी येथे आदरणीय रामकृष्ण ढेरे गुरूजींचा सत्कार करण्यात आला होता. अशा या लोककलेच्या उपासकाचा आज  दि.  13 ऑगस्ट रोजी स्मृतिदिन आहे.या महाराष्ट्राच्या लाडक्या आणि आदरणीय लोककलावंतास त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! आणि त्यांच्या उत्तुंग कार्यास मानाचा मुजरा!


  – प्रा. प्रकाश वाकळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *