अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष ,,, शैलजा बाबुराव कुचेकर …..

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष


शैलजा बाबुराव कुचेकर …..

लेखमालिका : पुष्प – पंधरावे.

अण्णाभाऊंच्या शंभराव्या जयंतीवर्षात म्हणजेच जन्मशताब्धी वर्षात ही एक छान, आणि अगदीच आनंददायी घटना की आमच्या भगीनी शैलजा बाबुराव कुचेकर ज्या आमच्या बीड जिल्हायातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजीराव महाविद्यालयात कार्यरत आहेत,त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्य पदवी पीएच.डी आणि ती ही इंग्रजी विषयात संपादीत केली.

“शशी थरुर, विकास स्वरुप आणि चेतन भगत यांच्या कादंबरी लेखणातील कथन कौशल्य”
(Narrative Techniques in the Novels of Shashi Tharoor, Vikas Swarup and Chetan Bhagat) या विषयावर आपलं संशोधन केलेलं आहे. त्यामुळं अगदीच आरंभी स्नेही शैलजाताईंचं मन:पुर्वक अभिनंदन करतो.
सन्मित्रहो !आठराव्या शतकात सावित्रीमाईंच्या शाळेत मुक्ता साळवे ही लहुजींची नात शिकली आणि तिने लिहिलेला निबंध आपणा सर्वांना माहीत आहे. स्नेही बळीराम जोगदंड कुठल्याही सामाजीक उपक्रमांमधून तो निबंध मान्यवर पाहुण्यांना सप्रेम भेट देतात.त्याच मुक्ता साळवे या कन्येच्या पावलावर पावलं टाकत बहुजन समाजाच्या मुली गांभीर्यानं शिक्षण शिकताना पाहून मोठा आनंद वाटतो आहे. मला या पार्शभूमीवर आमच्या या भगीनीचं पीएच डी होणं आणि ते ही इंग्रजी विषयात हे संशोधन कार्य करणं मोठं मौलिक वाटणं स्वाभावीक आहे.
आज सकाळी स्नेही प्रा. डॉ. सोमनाथ कसबे जे कळंब येथील छ. शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, महोदयांचा फोन आणि वॉट्सअपवर मेसेजही आला. मंडळीची पीएच डी तोंडी परीक्षा असल्याचं सांगून साडे आकरावाजता व्हायवाला अॉनलाईन यायला सांगीतलं. अगदीच आनंद वाटला. जवळजवळ साठ-एक जन या सन्माननीय उपक्रमास गुगलमीटवर अॉनलाईन उपस्थित होतोत. आरंभी शैलजाताईंनी आपलं मनोगत आणि संशोधन कार्याचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थीत मान्यवरांनी या तोंडी परीक्षेत प्रश्नोत्तरं केली ज्यांना शैलजाताईंनी आभ्यासपुर्ण उत्तरं देऊन आपल्या आभ्यासाची चुनुक दाखवुन दिली, हे पाहुनही मला मोठा आनंद वाटला.
प्रा.डॉ आत्माराम गंगणे, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन विभाग प्रमुख, ज्ञानोपासक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,परभणी येथे कार्यरत आहेत. महोदय आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि आमच्या माजी प्राचार्य दिवंगत जगताप सरांचे जावई आहेत, राडीचे आहेत, यांनी संशोधना दरम्यान शैलजाताईंच्या आभ्यासू स्वभावाबद्दल सांगताना त्यांनी अडीअडचनींवर कशी मात केली हे सांगीतलं तेंव्हा उर भरून आला.लहान मूल आणि हा असा कायम चिकित्सा मागणारा आभ्यास आणि तो ही इंग्रजी भाषेतुन करायचा म्हणजे दिव्य.परंतू आमच्या या भगीनीनं पेललेला हा सगळा आभ्यासाचा भार पहाता अभिनंदन आणि जाहिर कौतुक याशिवाय मला कांही सुचत नाही. आत्माराम गंगणे हा माणुस साधा पीएच डी चा सिनॉपशीसही मनासारखा झाला नाही तर पुढं फॉरवर्ड करत नाही हा किस्सा माझे  आखाडा बाळापुरचे सन्मित्र डॉ देशमुख आणि मानवतचे सन्मित्र डॉ सुभाष शिंदे यांनी आमच्या सागरच्या रिफ्रेशर कोर्स दरम्यान मला सांगीतला होता. सुभाषरावांनीही गंगणे सरांच्याच मार्गदर्शनाखाली आपलं संशोधन कार्य संपन्न केलं आहे आणि ते ज्ञानोपासकेच आता संशोधन मार्गदर्शकही आहेत. माझे कवी मित्र कल्याण कदम जे औंढानागनाथला आहेत त्यांचंही संशोधन कार्य आत्मारामजींच्याच मार्गदर्शनाखाली पुर्ण झालं आहे.वेळ लागतो परंतू माणुस तयार होतो हा या सगळ्या सन्मित्रांचा अनुभव आहे.अशा या अवघड सासूच्या हाताखाली हा पुरण पोळीच्या रुचकर जेवनाचा बेत त्यांच्या प्रसंशेसह पार पाडायचा म्हणजे आनंदच हो.
डॉ भगवानराव जाधव, जे पुर्वी परभणीच्याच  ज्ञानोपासक महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि नंतर विद्यापिठाचे डीन झाले आणि आता परत डीन म्हणून महोदय कार्यरत आहेत,यांच्या अध्यक्षतेखाली हा व्हायवा आज सकाळी संपन्न झाला. संशोधन विषयाच्या पैलुंवर अतीशय सुदृढ चर्चा घडवून आणली महोदयांनी.संशोधन विद्यार्थीनीनेही निर्भीडपणे उत्तरं देऊन आपल्या आभ्यासाचा परीचय करुन दिला.
बहिस्थ परीक्षक डॉ एस एस खांडेकर हे डॉ एस डी डी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाडा, पालघर येथून या व्हायवासाठी अॉनलाईन होते. त्यांनी तपासून विद्यापिठाला लेखी अहवाल कळवल्यानंतर ही परीक्षा संपन्न झाली ज्यात महोदयांनी संशोधक विद्यार्थीनी शैलजाताईंच्या संशोधनाचं कौतुक करुन अभिनंदन केलं. संशोधक विद्यार्थीनीने आणि संशोधन मार्गदर्शकांनीही कसल्या उनिवा न ठेवल्याचं सांगून संशोधनातील गुणवत्तेबद्दल आनंद व्यक्त केला. ही सगळी चर्चा पहायला, एेकायला, सहभागी व्हायला जवळ जवळ आम्ही साठ-एक जन उपस्थित होतोत. बहिस्थ परीक्षक डॉ खांडेकर जेंव्हा म्हणाले, I strongly recommand the Chairman and the SRT University authorities to consider this thesis to be awarded the Ph. D Degree in English, मन आनंदानं भरुन गेलं.
पीएच डी आणि ती ही इंग्रजी विषयात आणि ती ही अशा मुलीनं जीच्या समाजानं जगणं केवळ परीस्थितीचे चटके सहन करत काढलं आहे, अशा पार्श्वभूमीवर मला हे यश उतुलनीय वाटतं. एक चांगला इंग्रजीचा आणि गणिताचा शिक्षक चांगला नसलेल्या शाळेला विचारा यातना काय असतात त्या.हे असं उच्च शिक्षण घेऊन वर्गात उभं राहण्याचा जो गौरव असतो तो पैशात नाही मोजता येत.
बुद्ध -कबीर- जिजाऊ- शिवराय- महात्माफुले- सावित्रीमाई -लहुजी-मुक्ता-बाबासाहेब-रमाई-आण्णाभाऊ अशा मोठ्या व्यापक विवेकी वर्तुळाला मोठा आनंद देणारी ही घटना आहे. या विस्तारीत प्रज्ञा प्रदेशाचा प्रतिनिधी म्हणून मी शैलजा अर्थात आता प्रा. डॉ शैलजा बाबुराव कुचेकर हे माहेरचं नाव आणि सासरचं नाव प्रा. डॉ शैलजा सोमनाथ कसबे यांचं मन:पुर्वक अभिनंदन करतो.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात या आनंदाला अजूनही मोठा व्यापक अर्थ आहे

.

▪प्रा. डॉ मुकुंद राजपंखे,

संशोधन मार्गदर्शक,पदवी व पदव्युत्तर इंग्रजी विभाग प्रमुख,

यशवंतराव चव्हाण महाविद्यीलय,अंबाजोगाई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *