दतात्रय एमेकर यांचा शुभेच्छा संदेश व महाराखी उपक्रमाने भारतीय सैनिकांना उर्जा मिळेल – तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांचे प्रतिपादन
कंधार ; ता.प्र.
भारतीय सैनिक हे आपल्या कुटूंबा पासून कोसोदुर राहुन सरहद्दीवर डोळ्यात तेल टाकून देशाचे रक्षण करतात परीणामता कोणतेही सण उत्सव त्यांना साजरे करता येत नाही हा धागा पकडून कंधार येथिल दिव्यांग हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांच्या भारतीय सैनिकांना राखी या उपक्रमाने उर्जा मिळेल असे प्रतिपादन तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले.
दि.२४ जुलै रोजी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते भारतीय सैनिकांना शुभेच्छा संदेश या पत्राचे विमोचन करण्यात आले त्यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे बोलत होते.
गेल्या ७ वर्षापासून त्यांच्या सुंदर अक्षर कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना ३३३३ शुभेच्छा संदेश व १५ फुटाची महाराखी भारतीय सैनिकांच्या बटालीयनला दरवर्षी पाठवण्यात येते.
तसेच त्यांचा या उपक्रमाला भारतीय जवान खुष होवून दरवर्षी आपल्या शालेय बहीणीने पाठवलेल्या शुभेच्छा संदेश स्विकारुन शालेय साहित्य पुन्हा टपाली दत्तात्रय एमेकर यांच्या पत्यावर पाठवतात.सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत म्हणून यावर्षी फक्त दोन बटालीयनला १५ फुटाच्या दोन महाराख्या सोबत १५१ राखी व शुभेच्छा संदेश पत्र पाठवण्यात येणार अशी माहीती दत्तात्रय एमेकर यांनी यावेळी दिली.
तसेच दि.२ आँगस्ट रोजी कंधार पोलीस स्टेशन येथुन भारतीय टपाल विभागा मार्फत सदरील शुभेच्छा संदेश व महाराख्या सिमेवार जाणार आहेत.ही महाराखी तयार करण्यासाठी महात्मा फुले विद्यालय कंधार येथिल वर्ग पाचवीतील कु.शिवानी मारोती गित्ते व कु.जानव्ही माधव केंद्रे या दोन चिमुकल्यांनी आपली हस्तकला सादर करत सहभाग नोंदवला .
या शुभेच्छा संदेश विमोचन सोहळा प्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड,मुख्याध्यापक राजहंश शहापुरे ,मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे ,पत्रकार हफीज घडीवाला,महमंद सिंकदर,माजी सैनिक कांबळे ,मन्मथ थोटे,लिपीक पानपट्टे,लक्ष्मीबाई पेठकर आदीची यावेळी उपस्थिती होती.