नांदेड –जागतिक बौद्ध परिषद बॅंकाॅक थायलंडचे प्रादेशिक केंद्र आणि मराठवाड्यातील पहिले बुद्ध विहार, प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ नांदेड येथे आषाढ तथा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने *”धम्मपद : कथा आणि गाथा”* या ग्रंथाचे वाचनास सुरुवात करण्यात आली आहे.या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखों लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर २४ फेब्रुवारी १९५८ रोजी स्थापित झालेले जागतिक बौद्ध परिषद बॅंकाॅक थायलंडचे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ नांदेड येथे दरवर्षी बौद्ध धम्मातील वर्षावास कार्यकाळात डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित *बुद्ध आणि त्यांचा धम्म* ग्रंथ वाचनाची प्रचलित प्रथा बाजूला ठेवून यावर्षी बौद्ध धम्मातील मौल्यवान अशा *धम्मपद : कथा आणि गाथा* या ग्रंथाचे वाचन सुरु करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रज्ञा करुणा विहार समितीचे तथा रिपाइंचे सदस्य आयु. प्रकाश मा येवले, सुभाष लोखंडे आणि उपासिका शोभाताई गोडबोले यांनी पुष्प अर्पण केल्यानंतर त्रिशरणं पंचशिलासह बुद्ध धम्म आणि संघ वंदना बौद्ध उपासक राहुल कोकरे आणि डी एन कांबळे यांनी सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना प्रदान केली. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणा सर्वांना बौद्ध धम्म दीक्षा दिल्यानंतर बौद्ध समाजाने जाणिवपूर्वक बौद्ध संस्कृतीचे आचरण करावे बौद्ध धम्माला काळीमा फासणारी कोणतीही गोष्ट आपणाकडून घडणार नाही असे वर्तन ठेवावे. आणि २२ प्रतिज्ञांचे पालन करावे असे सांगितलेले आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी आचरण करावे आणि बौद्ध धम्म काय आहे हे समजण्यासाठी बौद्ध धम्मातील मौल्यवान अशा *धम्मपद : कथा आणि गाथा* या ग्रंथाचे वाचन यावर्षी सुरु केल्याचे प्रकाश येवले यांनी सांगितले. आणि उपासक राहुल कोकरे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात ग्रंथ वाचन सुरु केले.
हे ग्रंथ वाचन ऑक्टोबर २०२१च्या अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत चालू राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक व प्रज्ञा करुणा विहाराचे व्यवस्थापक आयु. सुभाष लोखंडे यांनी केले. यावेळी आषाढ तथा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपासिका शोभाताई गोडबोले यांच्यावतीने सर्व उपस्थितांना खिर वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास डी एल कांबळे निर्मलाताई अशोक पंडित, सौ शिल्पाताई सुभाष लोखंडे, विमलबाई मधूकर चौत्राबाई चींतूरे पंचशीला बाई गोमाजी हटकर जिजाबाई खाडे सौ प्रतिभा गोडबोले उपासीका धम्माबाई नरवाडे सौ पार्वतीबाई हिंगोले, भिमाबाई हटकर, सौ सुमनबाई वाघमारे सौ रंजनाबाई वाळवंटे विमलबाई राजभोज, सौ पदमीनबाई गोडबोले आशाबाई हाटकर या मातोश्री रमामाता आंबेडकर महिला मंडळाच्या सदस्यां आवर्जून उपस्थित होत्या.