लोहा तालुक्यात ढगफुटी ; सावरगाव नसरत येथे बैलगाडी सह दोन सक्या जावा पुरात वाहून मयत

लोहा : प्रतिनिधी शैलेश ढेबंरे

लोहा तालुक्यातील सावरगाव, मस्की, बेरळी, देऊळगाव, हिप्परगा, चितळी, मुरंबी, आदी गावामध्ये ढगफुटी झाली. या ढगफुटीमध्ये झाली सावरगाव नसरत येथे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊसासह ढगफुटी झाली. या अचानक झालेल्या ढगफुटीमध्ये दोन महिला वाहून जावून मयत झाल्या आहेत.

सोमवारी दुपारी अचानक झालेल्या ढगफुटीमध्ये सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. ढगफुटीचे पाणी वाढल्यामुळे ते आपल्या बैलगाडी सह घराकडे येथ होते रस्त्यावर नदी आहे. नदी ओलांडून येतांना अचानक नदीला पराच्या पाण्याचा लोट आला. पुराचा लोट आल्यामुळे बैलगाडी पलटी होऊन वाहून गेली,

गाडीमध्ये अमोल दगडगावे, भाऊ विवेक दगडगावे, पत्नी शिवमाला अमोल दगडगावे, आई मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पाच जन होते. त्यातील मयत मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, वय ५२ वर्षे, ह्या हुलेवाडी येथील पुलापासी आढळल्या तर मयत पार्वतीबाई संभाजी दगडगावे वय ४५ वर्षे ह्या पालम तालुक्यातील पेंडू येथे सापडल्या या दोन्ही सक्या जावा पुरात वाहून मयत झाल्या तर अमोल दगडगावे, विवेक दगडगावे, शिवमाला दगडगावे, हे मात्र झाडाच्या फांदीला धरुन आपला जिव वाचवण्यात यशस्वी झाले.

..सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी पांडूरंग बोरगावकर, तहसीलदार राम बोरगावकर, माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस माणिक डोके, शिवसेना नेते बाळासाहेब कराळे, तालुका संघटक स्वप्निल पाटील गारोळे, शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. व प्रेताला पोस्टमाटमसाठी ग्रामीण रुग्णालय लोहा येथे पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *