कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौ. कंधारेवाडी येथिल स्वर्गीय तुकाराम विश्वनाथ जिनके यांचे ९ अॉगस्ट २०२० रोजी निधन झाले होते. सर्व मित्रांमध्ये मिसळून राहणाऱ्या तुकाराम यांच्या निधनाने मित्रपरीवाराला पोरके केले.
अवघ्या वयाच्या २३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या मित्राचे स्मरण म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर २०२० रोजी वाचनालय व रक्तदान शिबीर आयोजित करुन एक आनोखी श्रद्धांजली मित्र परीवाराने वाहीली होती .
त्यांचं अनुसंगाने गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी म्हणजेच 5 सप्टेंबर ला तुकाराम विश्वनाथ जिंके यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2 रे रक्तदान शिबिर राबवण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून कंधारेवाडी चे तंटामुक्ती अध्यक्ष भगवान नारायण कंधारे होते.
तुकाराम हा गरीब घराण्यातील हुशार व होतकरू विद्यार्थी होता मैत्रीच्या दुनियेतील राजा म्हणून राहणार असा एक तुकाराम जिंके होता त्याची आठवण म्हणून मित्रांनी हा उपक्रम राबविण्यात आला. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान . त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतात रक्तदान केल्याने आरोग्य सुधारते वजन नियंत्रणात राहते आणि शारीरिक आरोग्य लाभते अशी तज्ञांचे म्हणणे आहे.
आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो असा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपल स्वतः रक्त सांडतो तसंच आपलं रक्त कोणालातरी जीवनदान देऊ शकते.
गावातील तसेच बाहेर गावातील मित्रपरिवार ने जवळपास 20 जणांनी रक्तदान केले.
प्रमुख उपस्थिती सरपंच शंकर डिगोळे ,नाशिक ग्रामीण पोलीस गजानन गोटमवाड,योगेश मुंडे सर ,सोपान मुंडे सर, ज्ञानेश्वर नाईकभाऊ ,पत्रकार युवाराज्य न्यूज लाईव्ह चे तालुका उप प्रतिनिधी मारुती जिंके, बालाजी केंद्रे ,गणेश कंधारे, न्यानेश्वर बारोळे, माऊली डिगोळे, कृष्णा कंधारे ,सिद्धेश्वर पल्लेवाड व इतर मित्रपरिवार हजर होते.