कंधार ; उस्माननगर प्रतिनिधी
दि. 06/09/2021
कंधार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बीट उस्माननगर येथे उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी मा.वसंत मेटकर यांच्या संकल्पनेतून शिक्षक दिनानिमित्त बीटस्तरीय गुरू गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.लक्ष्मीबाई व्यंकटराव पा.घोरबांड (सभापती, प.सं. कंधार) या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्माननगर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.वसंत मेटकर, मा.दत्ता पाटील घोरबांड, मा.जयवंत एस. काळे (मु.अ./कें.प्र.) उस्माननगर, मा.ढोणे व्ही. के. (कें.प्र.) चिखली, मा.कनशेट्टे बी.एम. (मु.अ./कें.प्र.)शिराढोण,मा.देविदास डांगे(पञकार) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानमाता सावित्रीबाई फुले व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली.
या वेळी बीट उस्माननगर अंतर्गत येणाऱ्या उस्माननगर, शिराढोण, व चिखली या तिन्ही केंद्रातून प्रत्येकी दोन शिक्षकांची बीट स्तरीय गुरू गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
सदरील निवडक शिक्षकांना कंधार पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ.लक्ष्मीबाई व्यंकटराव घोरबांड यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .
त्यात श्री.गादेकर दत्ता गोविंदराव (पदो. मु.अ.)जि. प. प्रा. शा. लाठ(खु.),
सौ.सीमा बाळकृष्ण जोशी (मु.अ.)जि.प.प्रा.शा. संगुचीवाडी,
श्री.कैलास दासराव पांचाळ (स.शि.) जि.प.प्रा.शा. दाताळा,
सौ.संगीता विजयकुमार मानकोसकर(स.शि.)जि. प. प्रा. शा. दहिकळंबा,
श्री.बळवंत निळकंठ हंबीर(स.शि.)जि.प.के.प्रा.शा.चिखली,
श्री.शिवशंकर आनंदराव पाटील (स. शि.)जि.प.प्रा.शा.गुंडा
या शिक्षक व शिक्षिकांचा समावेश होता,त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी समयोचित मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख श्री जयवंत काळे यांनी केले तर सदरील कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन साहित्यिक बाबाराव विश्वकर्मा यांनी केले, व आभार केंद्रप्रमुख कनशेट्टे बी. एम.यांनी मानले. या कार्यक्रमाला बीट उस्माननगर अंतर्गत शाळेचे सर्व मु.अ. व शिक्षकांची उपस्थित होती.